AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रायगडमध्ये मजुरी करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, ठेकेदारावर अ‍ॅट्रोसिटी, बलात्काराचा गुन्हा दाखल

रायगड येथे 16 वर्षीय मजुरी करणाऱ्या अल्पवयीन आदिवासी मुलीवर ठेकेदारनाने बलात्कार केला आणि जातीवाचक शिवीगाळ केली (Rape on minor girl in Raigad).

रायगडमध्ये मजुरी करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, ठेकेदारावर अ‍ॅट्रोसिटी, बलात्काराचा गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Oct 10, 2020 | 8:37 AM

रायगड : रायगड येथे 16 वर्षीय मजुरी करणाऱ्या अल्पवयीन आदिवासी मुलीवर ठेकेदारनाने बलात्कार केला आणि जातीवाचक शिवीगाळ केली (Rape on minor girl in Raigad). ही घटना जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली येथे घडली. याबाबत गुरुवारी (8 ऑक्टोबर) रात्री साडेअकरा वाजता पाली पोलीस स्थानकात ठेकेदारा विरोधात बलात्कार, अ‍ॅट्रोसिटी आणि पॉस्को अतंर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत (Rape on minor girl in Raigad).

या ठेकेदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सर्व चौकशी करून शुक्रवारी (9 ऑक्टोबर) सायंकाळी अटक केली जाणार आहे, असे पाली पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी सांगितले होते.

याबाबत पाली पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार पीडित 16 वर्षीय आदिवासी मुलगी सध्या पाली येथील डहाणू या बिल्डिंगमध्ये बांधकाम मजुरीचे काम करत होती. तेथील ठेकेदार नितीन महादू पाटील (वय 34) हा सुद्धा तेथे काम करत होता.

ठेकेदाराने 1 जानेवारी 2019 ते 6 ऑक्टोबर 2020 या कालावधीत पाली बल्लाळेश्वर मंदिरासमोरील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खोलीत अल्पवयीन आदिवासी मजूर मुलीवर वारंवार बलात्कार करून जातीवाचक शिवीगाळ करायचा. तसेच या संदर्भात कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती.

याबाबत सदर अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारी नुसार पाली पोलीसांनी ठेकेदाराला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर या संपूर्ण प्रकरणाचा तपास रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी करत आहेत.

संबंधित बातम्या :

कल्याणमध्ये कुख्यात गुंडाने पोलिसांवर कुत्रे सोडले, एक तासाच्या थरारानंतर गुंडाला अटक

नवी मुंबईत 50 लाख रुपयांचा गुटखा जप्त, 4 जणांना अटक

पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार.
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.