रेमो डिसूझाच्या प्रकृतीत सुधारणा, नृत्यदिग्दर्शक अहमद खान यांनी दिली माहिती

मुंबई : बॉलिवूडमधील नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांना 11 डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर मुंबई येथील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेव्हा रेमो डिसूझाला हृदयविकाराचा झटका आल्याचे समजल्यावर सर्वच जण चकित झाले होते. रेमोच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना या विषयी माहिती कळताच त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. (Remo D’Souza’s condition improved, choreographer Ahmed Khan said) […]

रेमो डिसूझाच्या प्रकृतीत सुधारणा, नृत्यदिग्दर्शक अहमद खान यांनी दिली माहिती
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 10:55 AM

मुंबई : बॉलिवूडमधील नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांना 11 डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर मुंबई येथील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेव्हा रेमो डिसूझाला हृदयविकाराचा झटका आल्याचे समजल्यावर सर्वच जण चकित झाले होते. रेमोच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना या विषयी माहिती कळताच त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. (Remo D’Souza’s condition improved, choreographer Ahmed Khan said)

जेव्हा त्याला रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा पत्नी लीजेल त्याच्याबरोबर होती. ही बातमी ऐकल्यानंतर प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक अहमद खान यांनाही धक्का बसला होता. अहमद खान आणि रेमो डिसूझा एकमेकांचा आदर करतात, पण दोघेही खूप चांगले मित्र देखील आहेत. ईटाइम्सच्या माहितीनुसार, जेव्हा अहमद खानला रेमोच्या प्रकृतीविषयी विचारले गेले तेव्हा ते म्हणाले की, रेमोला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याचा फोन मला आला होता. आम्ही सर्वजण काळजीत होतो, पण आता त्याची प्रकृती ठीक आहे. तो बरा होत आहे. अहमद खान पुढे म्हणाले की, या बातमीने त्यांना धक्का बसला होता. कारण रेमो त्याच्या फिटनेसबद्दल खूप गंभीर आहे. मात्र, जेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे समजले तेव्हा त्यावर विश्वासच बसला नव्हता. रेमो डिसूझाने अनेक हिट चित्रपटांची गाणी कोरिओग्राफ केली आहेत. यानंतर ते डान्स इंडिया डान्सचे जज होते. यशस्वी नृत्यदिग्दर्शक झाल्यावर त्यांनी दिग्दर्शनासाठीही प्रयत्न केला आणि फालतू चित्रपटाचे दिग्दर्शन केले. यानंतर 2013 मध्ये त्यांनी ‘एबीसीडी’ हा डान्सवर आधारित चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटनंतर त्यांनी 2015 मध्ये एबीसीडी 2 प्रदर्शित केला. या चित्रपटात वरुण धवन, श्रद्धा कपूर आणि प्रभुदेवा मुख्य भूमिकेत होते. कोरिओग्राफी आणि चित्रपटाच्या दिग्दर्शनाशिवाय रेमो डिसूझा एक यशस्वी जज देखील आहेत. डान्स इंडिया डान्ससोबतच ते कलर्सच्या शो झलक दिखलाजा आणि स्टार प्लस ‘डान्स प्लस’वर जज म्हणून त्यांनी उत्तम काम केले आहे. रेमो डिसूझा यांचा जन्म 2 एप्रिल 1972 रोजी कर्नाटकच्या बेंगळुरू येथे झाला. रमेश यादव असे त्याचे खरे नाव आहे. त्यांच्या वडिलांचे नाव गोपी नायक आहे, रेमो डिसूझा यांनी गुजरातमधील जामनगर येथून शिक्षण घेतले. शाळेच्या दिवसांत तो खूप चांगले खेळाडू होते. त्यावेळी त्यांना अनेक मोठे पुरस्कारही मिळाले होते. डिझाइनर असलेल्या लीजेलशी त्याचे लग्न झाले आहे. त्यांना ध्रुव आणि गबिरिल हे दोन मुलगे देखील आहेत.

संबंधित बातम्या : 

Neetu Kapoor | नीतू कपूरची कोरोनावर मात, लवकरच ‘जुग जुग जियो’चे शूटिंग सुरू करणार!

KGF 2 | कर्करोगावर मात करून संजय दत्त शूटिंगवर हजर, दमदार अ‍ॅक्शने केली सुरूवात!

(Remo D’Souza’s condition improved, choreographer Ahmed Khan said)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.