मराठा आरक्षण समितीवरून चव्हाणांना हटवून एकनाथ शिंदेंना अध्यक्ष करा; नरेंद्र पाटील यांची मागणी

चंद्रकांत पाटलांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न योग्य पध्दतीने हाताळला होता त्यामुळे अशोक चव्हाणांना पदावरून काढून टाका अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

मराठा आरक्षण समितीवरून चव्हाणांना हटवून एकनाथ शिंदेंना अध्यक्ष करा; नरेंद्र पाटील यांची मागणी
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 6:46 PM

कराड : मराठा समाजाच्या समितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाणांना हटवावं आणि एकनाथ शिंदेना मराठा समितीचे अध्यक्षपद द्यावं असं मत आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी कराड इथं व्यकत केलं आहे. यावेळी अशोकराव चव्हाणांनी मराठा समाजाला थर्ड लावला. चंद्रकांत पाटलांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न योग्य पध्दतीने हाताळला होता त्यामुळे अशोक चव्हाणांना पदावरून काढून टाका अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे. (Remove Ashok Chavan from chairman of Maratha Samaj Samiti said by Narendra Patil)

शिवसेना – भाजप सरकारच्या काळात मराठा समाजाच्या समितीच्या अध्यक्षपदी असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणाचा प्रश्न योग्य पध्दतीने हाताळला होता. मात्र, सध्याचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यामुळे मराठा समाजाचं नुकसान झालं असल्याने त्यांना हटवावं. अशात मोठं योगदान असलेल्या एकनाथ शिंदे यांची अध्यक्षपदी असावे अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडेही केलेली होती असं आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले की, ‘आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विनंती केली होती की, एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाची जी उपसमिती आहे, त्यांचे त्यांना अध्यक्ष करा. कारण ज्यावेळेला भाजप- शिवसेनेचे सरकार होतं. त्यावेळेच्या उपसमितीत शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांनी खूप चांगल्या प्रकारे काम करत होते.

मराठा समाजाच्या मुले- मुलींच्यासाठी ठाणे जिल्ह्यामध्ये पहिले वसतिगृह जे झाले ते एकनाथ शिंदेनी केले. यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. परंतु आमची विनंती मुख्यमंत्र्यांनी मान्यच केली नाही. त्यांनी अशोकराव चव्हाणांना आणून बसवलं, त्यांनी मराठा समाजाला थर्ड लावला अशा शब्दात नरेंद्र पाटील यांनी चव्हाणांनावर टीका केली आहे.

इतर बातम्या –

चालू खात्याबाबत 15 डिसेंबरपासून नवा नियम, कर्ज घेणाऱ्या ग्राहकांवर परिणाम काय?

पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल साडे आठ लाख नागरिकांना कोरोना संसर्ग होऊन गेला : सर्व्हे

(Remove Ashok Chavan from chairman of Maratha Samaj Samiti said by Narendra Patil)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.