महाराष्ट्रात आणखी एका बँकेला टाळं ! परवानाच रद्द झाल्याने ठेवीदारांचा जीव टांगणीला
सातारा जिल्ह्यातील नावाजलेली 'कराड जनता बँक' दिवाळखोरीत गेल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडीने या बँकेचा परवाना रद्द केला आहे. (Karad Janata Bank)
सातारा : मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घातल्यानंतर आता राज्यातील आणखी एका बँकेला रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार टाळं लावण्यात आलं आहे. सातारा जिल्ह्यातील नावाजलेली ‘कराड जनता बँक’ दिवाळखोरीत गेल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडीने या बँकेचा परवाना रद्द केला आहे. पवानाच रद्द केल्यामुळे बँकेतील ठेवीदारांचा जीव टांगणीला लागला आहे. ( Reserve Bank of India has revoked the license of Karad Janata Bank)
कराड जनता बँक ही सातारा जिल्ह्यात एक नावाजलेली बँक आहे. सहकाराच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या या बँकेचे हजारो ठेवीदार आहेत. या बँकेवर 2017 साली रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले होते. त्यानंतर आता ही बँक दिवाळखोरित गेल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. ही अधिकृत घोषणा सहकार आयुक्तांनी केली आहे. त्यामुळे या घोषणेनंतर आता ठेवीदारांच्या पैशांचं काय?, असा प्रश्व विचारला जाऊ लागला आहे.
संचालकांवर 310 कोटींच्या अपहाराचा गुन्हा
कराड जनता बँकेचा व्याप मोठा आहे. सहकारातून उभ्या राहिलेल्या या बँकेच्या सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे तसेच मुंबई येथे शाखा आहेत. या बँकेच्या महाराष्ट्रात एकणू 29 शाखा आहेत. तर सध्या या बँकेचे 32 हजार सभासद आहेत. सभासदांची संख्या लक्षात घेता या बँकेचा व्याप मोठा असल्याचे लक्षात येते. मात्र, बँकेच्या संचालकांवर 310 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला; तसा गुन्हाही त्यांच्या विरोधात नोंदविण्यात आला होता. त्यानंतर 2017 साली रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध घालण्यात आले होतेे. यानंतर या बँकेच्या अर्थकारणाचा आलेख घसरल्याचे सांगण्यात येत आहे.
मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध
महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यामध्ये असलेल्या मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवरसुद्धा (Mantha Urban Cooperative Bank) निर्बंध घालण्यात आले आहेत. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 17 नोव्हेंबर 2020 पासून पुढच्या सहा महिन्यांसाठी या बँकेवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आरबीआयच्या या निर्णयामुळे ग्राहकांच्याही अडचणी वाढलेल्या आहेत.
संबंधित बातम्या :
अमृता फडणवीसांमुळे ठाकरे सरकारने …
PMC बँक घोटाळ्याप्रकरणी वाधवान …
24 तासांत दोन बँकांवर धडक कारवाई …
( Reserve Bank of India has revoked the license of Karad Janata Bank)