प्रख्यात दिग्दर्शक महेश भट्ट आणि रिया चक्रवर्तीचे ‘कथित’ व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

'जलेबी' चित्रपटातील रियाची 'आएशा' ही व्यक्तिरेखा होती. रियाने भट्ट यांच्याशी गप्पा मारताना यासंदर्भात काहीतरी लिहिले आहे.

प्रख्यात दिग्दर्शक महेश भट्ट आणि रिया चक्रवर्तीचे 'कथित' व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
Follow us
| Updated on: Aug 21, 2020 | 9:27 AM

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी घडामोडींना वेग आला आहे. सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती रडारवर असतानाच आता रिया आणि प्रख्यात दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यातील ‘कथित’ व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल झाले आहेत. (Rhea Chakraborty and Mahesh Bhatt So called WhatsApp chat messeges from June 8th go viral)

रिया 8 जूनला सुशांतच्या घरी गेली होती, तेव्हा तिने दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याशी संपर्क साधला, असे म्हटले जाते. त्यावेळी तिने सुशांतसोबतच्या संबंधांबाबत महेश भट्ट यांच्याशी गप्पा मारल्या. आपणच सुशांतला सोडल्याचं तिने ‘व्हायरल चॅट’मध्ये म्हटलं आहे.

रिया आणि भट्ट यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप संभाषणात सुशांतबरोबरच्या संबंधाबद्दल तिचे वडील नाखूष असावेत, असे वाटते. महेश भट्ट यांनीच तिला विरोधात जाण्याचा सल्ला दिल्याचे दिसत आहे.

‘जलेबी’ चित्रपटातील रियाची ‘आएशा’ ही व्यक्तिरेखा होती. रियाने भट्ट यांच्याशी गप्पा मारताना यासंदर्भात काहीतरी लिहिले आहे.

काय आहेत ‘कथित’ व्हॉट्सअ‍ॅप चॅट मेसेज?

“आएशा पुढे निघून गेली आहे.. सर.. जड अंतकरणाने आणि सुटकेच्या निश्वासाने” असे रियाने लिहिले आहे. “शेवटचा कॉल हा ‘वेक अप कॉल’ होता” असे पुढच्या मेसेजमध्ये तिने लिहिले आहे.

“आता मागे वळून पाहू नका. जे अपरिहार्य आहे ते शक्य करा” असे उत्तर भट्ट यांनी दिले. तर दुसऱ्या मेसेजमध्ये “तुझ्या वडिलांना माझे प्रेम सांग. ते आता आनंदी असतील.” असे ते रियाच्या वडिलांना उद्देशून म्हणतात.

रिया चक्रवर्ती : “थोडेसे धैर्य मिळाले, फोनवर तुम्ही माझ्या वडिलांविषयी ज्या गोष्टी बोललात, त्यामुळे मला त्यांच्यासाठी कणखर होण्यास मदत झाली. त्यांनीही आपल्याला खूप प्रेम दिले आहे. नेहमीच स्पेशल राहण्यासाठी धन्यवाद”

महेश भट्ट : “तू माझं लेकरु आहेस (You are my child). मला हलकं वाटतंय”

रिया चक्रवर्ती : “आह शब्दच नाहीत सर. मला तुमच्याबद्दल सर्वोत्तम भावना आहेत”

(Rhea Chakraborty and Mahesh Bhatt So called WhatsApp chat messeges from June 8th go viral)

महेश भट्ट : धैर्य दाखवल्याबद्दल धन्यवाद

रिया चक्रवर्ती : मी तुम्हाला भेटले, यासाठी नियतीचे आभार; तुम्ही बरोबर आहात, आजच्या दिवसासाठी आपले मार्ग एका वळणावर एकत्र आले; एखाद्या चित्रपटासाठी नाही, पण काहीतरी वेगळंच, तुम्ही मला म्हटलेला प्रत्येक शब्द माझ्या मनात गुंजत आहे. तुमच्या बिनशर्त प्रेमाचा प्रभाव खोल जाणवत आहे.

संबंधित बातम्या :

सीबीआय मुंबई पोलिसांच्या संपर्कात, समन्वयासाठी नोडल अधिकारी नियुक्त

तपास कुणीही केला, तरी सत्य हे सत्यच; रिया सीबीआय चौकशीस तयार, वकिलांची प्रतिक्रिया

(Rhea Chakraborty and Mahesh Bhatt So called WhatsApp chat messeges from June 8th go viral)

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.