रिया चक्रवर्ती आणखी अडचणीत; न्यायालयीन कोठडीत 6 ऑक्टोबरपर्यंत वाढ!

8 सप्टेंबर रोजी रियाला अटक करून तिची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आली होती. पोलीस कोठडीऐवजी रियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली होती. (Rhea Chakraborty judicial custody extended till Oct 6)

रिया चक्रवर्ती आणखी अडचणीत; न्यायालयीन कोठडीत 6 ऑक्टोबरपर्यंत वाढ!
Follow us
| Updated on: Sep 22, 2020 | 4:44 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पुरत्या अडकलेल्या रिया चक्रवर्तीच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सुशांत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर तुरुंगात असलेल्या रिया चक्रवर्तीच्या न्यायलयीन कोठडीत 6 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान रिया आणि शौविक यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने दोघांचाही जामीन अर्ज फेटाळला. या आधीही न्यायालयाने दोन वेळा रियाचा जामीन अर्ज फेटाळला होता. (Rhea Chakraborty judicial custody extended till Oct 6)

रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडी मंगळवारी (22 सप्टेंबर) संपणार होती. 8 सप्टेंबर रोजी रियाला अटक करून तिची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आली होती. पोलीस कोठडीऐवजी रियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली होती. रियाने ड्रग्ज देवाण-घेवाणीत आपला सहभाग असल्याचे मान्य केल्यावर एनसीबीकडून तिला अटक करण्यात आली होती. रिया चक्रवर्ती या प्रकरणात दोषी आढळल्यास तिला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

अमली पदार्थ विकत घेणे, त्यासंदर्भात अन्य आरोपींशी संगनमत करणे, याबाबत रियाविरोधात भक्कम पुरावे असल्याचे ‘एनसीबी’ने म्हटले आहे. या संदर्भात एनसीबीचे पथक रियाची चौकशी करत होते. याआधी रियाचा भाऊ शौविक, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत, अमली पदार्थ विक्रेता झैद विलात्रा, राहील विश्राम, कैझान इब्राहिमसह नऊ जणांना ‘एनसीबी’ने अटक केली होती. त्यापैकी शौविक, सॅम्युअल, दीपेश यांच्यासमोर रियाची चौकशी करण्यात आली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे अमली पदार्थाशी जोडलेले आहेत का, याबाबतही एनसीबीकडून तपास सुरू आहे. (Rhea Chakraborty judicial custody extended till Oct 6)

ड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडकर अडकणार!

रिया चक्रवर्तीने ड्रग्ज कनेक्शनमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला बॉलिवूडमधील 25 कलाकारांची यादी दिल्याची धक्कादायक माहिती आहे. ड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडमधील बडी नावंही समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एनसीबीच्या चौकशीत अभिनेत्री रिया चक्रवर्तीने प्रख्यात अभिनेता सैफ अली खानची मुलगी आणि अभिनेत्री सारा अली खान, अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांची नावं  घेतल्याचा दावा केला जात आहे.

सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून सीबीआयने (केंद्रीय अन्वेषण विभाग) नोंदवलेल्या गुन्ह्यात रिया मुख्य आरोपी आहे. आर्थिक गैरव्यवहाराबाबत सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केलेल्या आरोपप्रकरणी ईडीकडून (सक्तवसुली संचालनालय) तपास सुरू आहे. रिया आणि अन्य आरोपींनी मोबाईलमधून डिलीट केलेले व्हॉट्सअ‍ॅप चॅट ईडीने रिस्टोर केले आहेत. त्यातूनच रिया आणि अन्य आरोपी अमली पदार्थ विक्रेत्यांच्या संपर्कात होते, अशी माहिती पुढे आली. त्यानंतर एनसीबीने गुन्हा नोंदवून या प्रकरणी तपास सुरू केला.

(Rhea Chakraborty judicial custody extended till Oct 6)

संबंधित बातम्या :

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.