‘हा’ धुरंदर भारतीय क्रिकेटपटू पोहोचला फुटबॉल सामना पाहण्यासाठी, जर्मनी विरुद्ध इंग्लंड मॅचचा घेतला आनंद

भारतीय खेळाडू क्रिकेट सामन्यापूर्वी सरावादरम्यान अनेक खेळ खेळत असतात. यात अनेकदा खेळाडू फुटबॉल खेळताना दिसतात. दरम्यान एक भारताचा युवा खेळाडूला फुटबॉल हा खेळ इतका आवडतो की तो थेट युरो चषकाचा सामना पाहण्यासाठी प्रेक्षक बनून मैदानात पोहोचला आहे.

'हा' धुरंदर भारतीय क्रिकेटपटू पोहोचला फुटबॉल सामना पाहण्यासाठी, जर्मनी विरुद्ध इंग्लंड मॅचचा घेतला आनंद
रिषभ पंत
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 2:00 PM

लंडन : भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (WTC Final) न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ आता इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये थांबला आहे. दरम्यान कसोटी मालिकेला बराच वेळ असल्याने सर्व खेळाडू सध्या विश्रांती घेत आपल्या परिवार किंवा मित्रांसोबत वेळ घालवत आहेत. प्रत्येकजण सोशल मीडियावर भटकंतीचे फोटो शेअर करत असताना एक क्रिकेटपटू थेट युरो चषकातील इंग्लंड विरुद्ध जर्मनी यांच्यातील फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी लंडनच्या विम्बली मैदानात पोहोचला आहे. (Rishabh Pant spotted at Stadium watching England vs Germany Euro 2020 match)

तर हा धुरंदर भारतीय क्रिकेटपटू म्हणजे युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत असून तो मंगळवारी युरो चषकातील (Euro Cup 2020) बाद फेरीचा इंग्लंड विरुद्ध जर्मनी (England vs Germany) सामना पाहण्यासाठी वेम्बली स्टेडियमवर गेला होता. पंतने आपल्या मित्रांसह स्टेडियममध्ये फोटोही काढले जे त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. या फोटोजना ‘हा सामना पाहण एक चांगला अनुभव होता’ असं कॅप्शनही पंतने दिलं आहे.

14 जुलैला पुन्हा एकत्र येणार भारतीय संघ

WTC final मध्ये पराभवाची निराशा दूर करण्यासाठी सर्व संघ आपल्या आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवत आहे. दरम्यान ही सुट्टी संपवून 14 जुलैला सर्व संघाला एकत्र लंडनमध्ये जमाव लागणार आहे. तेथून इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका खेळण्यासाठी सर्व संघ नॉटिंघमला रवाना होईल. इंग्लंड विरुद्धची 5 कसोटी सामन्यांची सिरीज ही 4 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.

हे ही वाचा :

Euro 2020 : बाद फेरीचे सामने संपले, आता 8 अंतिम संघामध्ये रंगणार युद्ध, वाचा उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक

Euro 2020 : रोमहर्षक सामन्यात स्पेनचा विजय, क्रोएशियाला नमवत नवा रेकॉर्डही केला नावे

कचरा केला म्हणून माजी भारतीय क्रिकेटपटूला दंड, गोव्याच्या एका गावातील प्रकार

(Rishabh Pant spotted at Stadium watching England vs Germany Euro 2020 match)

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.