पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे जेडीयू नेते नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. राज्यपालांनी हा दावा स्वीकारला आहे. त्यामुळे नितीश कुमार उद्या (16 नोव्हेंबर) पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, याच गोष्टीवरुन महागठबंधनच्या नेत्यांकडून सडकून टीका केली जात आहे. राजद नेते आणि राज्यसभेचे खासदार मनोज झा यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या प्रतिक्रियेत नितीश कुमार यांच्या सत्ता स्थापनेच्या दाव्यावर आक्षेप घेतला आहे (RJD leader Manoj Jha on CM Nitish Kumar).
“एखादी व्यक्ती फक्त 40 जागांवर विजय मिळवून मुख्यमंत्री कसं बनू शकते? कारण जनादेश त्यांच्याविरोधात आहे. त्यांनी राज्याची पूर्ण वाट लावली. त्यांनी यावर विचार करायला हवा”, असं मनोज झा म्हणाले.
“बिहार नक्की यावर काहीतरी उपाय शोधेल. या प्रक्रियेला दहा दिवस, एक आठवडा किंवा एक महिना लागू शकतो”, असा इशारा मनोज झा यांनी दिला (RJD leader Manoj Jha on CM Nitish Kumar).
How can someone become Chief Minister after getting 40 seats? People’s mandate is against him, he is decimated & should decide on it. #Bihar will find its alternative, which will be spontaneous. It might take a week, ten days, or a month but it will happen: RJD leader Manoj Jha pic.twitter.com/SDaUMTc4AY
— ANI (@ANI) November 15, 2020
दरम्यान, बिहारमध्ये सत्तास्थापनेच्या घडामोडी आणि बैठकांचे सत्र सुरु आहे. नितीशकुमार यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. नितीश कुमार सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. उद्या (सोमवार 16 नोव्हेंबर) दुपारी 11:30 ते 3 वाजण्याच्या दरम्यान शपथविधी होण्याची शक्यता आहे.
सुशील कुमार मोदी यांनी जवळपास 13 वर्षे बिहारमध्ये उपमुख्यमंत्रिपद भूषवले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ते उपमुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी जवळीक असल्याने सुशीलकुमार मोदींची वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपला अधिक मंत्रिपदं मिळण्याची चिन्हं
नितीशकुमारांच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान देण्यात येईल, याची चर्चा सुरु झाली आहे. भाजप एनडीएतील सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे मंत्रिमंडळात भाजपच्या कोट्यातून 18 ते 20 मंत्री केले जाऊ शकतात. त्याचबरोबर जेडीयूच्या कोट्यातून 12-14 मंत्री केले जाऊ शकतात. याशिवाय हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि व्हीआयपी या पक्षांना प्रत्येकी एक मंत्रीपद दिलं जाण्याची चर्चा आहे.
संबंधित बातम्या :
बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडून नवा चेहरा?
बिहारमध्ये राजकीय हालचाली वाढल्या; मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस
देवेंद्र फडणवीस एनडीएच्या बैठकीसाठी पाटण्याला, बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अधिकृत निर्णय होणार