इंजिन स्टार्ट, रोहित शर्माची सिडनी कसोटीसाठी तयारी सुरु!

रोहित शर्मा आज मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) सराव करताना दिसला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहितला सलामीचा फलंदाज म्हणून संधी मिळू शकते.

इंजिन स्टार्ट, रोहित शर्माची सिडनी कसोटीसाठी तयारी सुरु!
Follow us
| Updated on: Dec 31, 2020 | 7:25 PM

सिडनी (ऑस्ट्रेलिया) : भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज फलंदाज हिटमॅन रोहित शर्माचा (Rohit Sharma) क्वारंटाईन पिरियड नुकताच संपला आहे. गेल्या चौदा दिवसांपासून तो ऑस्ट्रेलियातील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन होता. मात्र, क्वारंटाईन पिरियड संपल्यानंतर काल (बुधवारी) त्याला टीम इंडियाला भेटण्यासाठी परवानगी मिळाली. रोहित आता भारतीय संघासोबत राहात असून त्याने तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी सराव सुरु केला आहे. रोहित आज मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) सराव करताना दिसला. 7 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहितला सलामीचा फलंदाज म्हणून संधी मिळू शकते. (Rohit Sharma gears up for Sydney Test with first practice session at MCG)

दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) त्यांच्या अधिकृत ट्विटरव हँडलवर दोन रोहित शर्माचे सराव करतानाचे दोन फोटो शेअर केले आहेत. सोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये बीसीसीआयने म्हटलंय की, इंजिन स्टार्ट होतंय आणि जे पुढे होणार आहे त्याची ही छोटी झलक आहे. मेलबर्न कसोटीत विजय मिळवल्यानंतर तिसऱ्या कसोटीसाठी अजून 6 दिवस आहेत त्यामुळे भारतीय संघ आराम करत असताना रोहित शर्मा मात्र मैदानात सराव करताना दिसला.

आयपीएलमध्ये दुखापत

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेदरम्यान, रोहितला दुखापत झाली होती. त्याच्या मांडीचे स्नायू दुखावले होते. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 संघात रोहितची निवड करण्यात आली नव्हती. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

टेस्टसाठी ‘टेस्ट’

रोहितला तिसऱ्या कसोटीत खेळणं वाटत तेवढ सोपं नाही. रोहितला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी आणखी एक फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. या टेस्टवर रोहितचं भवितव्य अवलंबून आहे.

रोहितसाठी कोणाला डच्चू मिळणार?

रोहितला तिसऱ्या सामन्यात संधी मिळाली, तर संघातून कोणाला वगळणार याबाबत चर्चा रंगू लागली आहे. तिसऱ्या सामन्यात मयंक अग्रवालला डच्चू मिळू शकतो. मयंक पहिल्या कसोटीत अपयशी ठरला. यानंतरही त्याला दुसऱ्या कसोटीत संधी दिली. मात्र या सामन्यातही तो अपयशी ठरला. यामुळे तिसऱ्या सामन्यात रोहितसाठी मयंकला बकरा केला जाऊ शकतो.

सिडनी टेस्ट जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिका खेळल्यानंतर आता उभय संघांमध्ये कसोटी मालिका सुरु आहे. पहिल्या कसोटीत भारताचा ऐतिहासिक पराभव झाला. मात्र, दुसऱ्या कसोटीत भारताने त्या पराभवाचा बदला घेतला. भारताने दुसरी कसोटी 8 विकेट्सने जिंकली. सध्या दोन्ही संघ मालिकेत बरोबरीत आहेत. यामुळे आगामी तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याचा मानस दोन्ही संघांचा असणार आहे.

रोहितची ऑस्ट्रेलियातील कामगिरी

रोहित ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 5 कसोटी सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 31 च्या सरासरीने 279 धावा केल्या आहेत. नाबाद 63 ही त्याची ऑस्ट्रेलियाविरोधातील सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.

रोहितने क्वारंटाईन पिरियडमध्ये काय केलं?

रोहित शर्माने क्वारंटाईन पिरियडमध्ये आपल्या खोलीमध्ये राहून फिटनेसकडे संपूर्ण लक्ष दिलं. यासाठी लवकर उठून तो खास व्यायाम करायचा. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी तो कष्ट घेत होता. ऑस्ट्रेलियातमध्ये कोरोना पेशंट्सची संख्या वाढायला सुरुवात झाल्याने सरकारने कोरोनासंबंधीचे काही नियम बनवले आहेत.

आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दुबईहून निघाली होती. मात्र वडिलांची प्रकृती स्थिर नसल्याने रोहित मुंबईत परतला होता. यानंतर रोहितने काही दिवस बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव केला. तसेच फिटनेस टेस्ट दिली. या फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्यानंतर रोहित सिडनीला रवाना झाला होता.

हेही वाचा

सिडनीची पसंती कांगारुंना, मात्र 42 वर्षांचा इतिहास बदलण्यास टीम इंडिया सज्ज

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचा तिसऱ्या कसोटीबाबत मोठा निर्णय

स्टार्कचा बंदोबस्त कसा करायचं? तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा मेगाप्लॅन

(Rohit Sharma gears up for Sydney Test with first practice session at MCG)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.