T20 World Cup मध्ये रवींद्र जडेजाची उणीव हा खेळाडू भरून काढेल
रोहित शर्मा आणि विराट कोहली सद्या चांगल्या फॉर्म आहेत.
आशिया चषकात (Asia Cup 2022) भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी न केल्यामुळे त्यांच्यावरती सोशल मीडियावरती (Social Media) जोरदार टीका केली होती. तसेच महत्त्वाच्या खेळाडूंची उणीव सुद्धा जाणवली होती. आशिया चषकात महत्त्वाच्या पाकिस्तान (Pakistan) आणि श्रीलंका यांच्या विरोधात ज्यावेळी मॅच झाली. त्यावेळी गोलंदाजांना यश न आल्याने टीम इंडीया आशिया चषकातून बाहेर पडली.
पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी 20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यासाठी 15 भारतीय खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. नवीन खेळाडूंचा अधिक भरणा असल्याने माजी खेळाडूंनी जोरदार टीका केली आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली सद्या चांगल्या फॉर्म आहेत. त्यामुळे टीम इंडिया अधिक धावा करु शकते. परंतु भरवशाचे गोलंदाज नसल्याने मॅच जिंकता येत नाही. फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा सध्या जखमी असल्याने तो त्याच्या घरी आहे.
रवींद्र जडेजाची उणीव आशिया चषकात महत्त्वाच्या सामन्यात कर्णधार आणि टीम व्यवस्थापनाला नक्की जाणवली असणार ? त्याची जागा अक्षर पटेल घेणार आहे.
अक्षर पटेलने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे होणाऱ्या विश्वचषकात सुद्धा तो चांगली कामगिरी करेल असा विश्वास भारतीय क्रिकेट सिलेक्शन टीमला आहे.
T20 विश्वचषक 2022 साठी टीम इंडीया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.