VIDEO : भरधाव बाईक, पेट्रोल टँकवर तरुणी, चालत्या गाडीवर रोमान्स

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील एका व्हिडीओ अनेकांच्या काळजाचे ठोके चुकवले आहेत. या व्हिडीओत बाईकस्वार तरुण-तरुणी वेगवान बाईकवरच एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. दिल्लीतील आयपीएस अधिकारी एचजीएस धालीवाल यांनी 18 सेकंदाचा व्हिडीओ आपल्या ट्विटवरुन शेअर केला आहे. धक्कादायक म्हणजे, तरुणी मागच्या सीटवर न बसता, बाईकच्या पेट्रोल टँकवर बसली आहे. दिल्लीतील राजौरी गार्डन क्रॉसिंगजवळील हा सर्व प्रकार […]

VIDEO : भरधाव बाईक, पेट्रोल टँकवर तरुणी, चालत्या गाडीवर रोमान्स
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील एका व्हिडीओ अनेकांच्या काळजाचे ठोके चुकवले आहेत. या व्हिडीओत बाईकस्वार तरुण-तरुणी वेगवान बाईकवरच एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. दिल्लीतील आयपीएस अधिकारी एचजीएस धालीवाल यांनी 18 सेकंदाचा व्हिडीओ आपल्या ट्विटवरुन शेअर केला आहे.

धक्कादायक म्हणजे, तरुणी मागच्या सीटवर न बसता, बाईकच्या पेट्रोल टँकवर बसली आहे. दिल्लीतील राजौरी गार्डन क्रॉसिंगजवळील हा सर्व प्रकार आहे.

आयपीएस अधिकारी एचजीएस धालीवाल यांनी तरुण-तरुणीचा व्हिडीओ ट्वीट करत म्हटलंय की, मोटर व्हेईकलसाठी नव्या कायद्याची गरज आहे. एचजीएस धालीवाल यांनी व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केल्यानंतर, व्हिडीओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला.

आयपीएस धालीवाल यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये तरुण-तरुणीचे चेहरे किंवा बाईकचा नंबर सुद्धा नीट दिसत नाही. मात्र, तरुण बाईक चालवत असून, चालत्या बाईकवर तरुणी तरुणाच्या पुढे पेट्रोल टँकवर बसून तरुणाला मिठी मारत होती. ज्या रस्त्यावरुन हे बाईकस्वार तरुण-तरुणी बाईक नेत होते, त्या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात गाड्या होत्या.

दिल्ली पोलिसांनी या व्हिडीओच्या माध्यमातून तपास सुरु केला आहे. दिल्लीतील पश्चिम विभागाच्या डीसीपी मोनिका भारद्वाज यांनी आवाहन केले आहे की, व्हिडीओ शूट करणाऱ्याने पुढे यावं आणि या घटनेबद्दल आणखी माहिती द्यावी, जेणेकरुन तपासात मोठी मदत होईल.

दरम्यान, तूर्तास या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञात तरुण-तरुणीविरोधात आयपीसी सेक्शन 279 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.