ओम राऊतच्या ‘तान्हाजी’तील खलनायक ‘आदिपुरुष’मध्येही

प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या 'आदिपुरुष'मध्ये अभिनेता सैफ अली खान लंकेश ही खलभूमिका साकारणार आहे.

ओम राऊतच्या 'तान्हाजी'तील खलनायक 'आदिपुरुष'मध्येही
Follow us
| Updated on: Sep 03, 2020 | 9:00 AM

मुंबई : ‘तान्हाजी’ या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन केल्यावर ओम राऊत आता ‘बाहुबली’ स्टार प्रभाससोबत ‘आदिपुरुष’वर काम करणार आहे. या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी अभिनेत्याची निवडही झाली आहे. ‘तान्हाजी’त उदयभान सिंह राठोडची नकारात्मक भूमिका साकारणारा अभिनेता सैफ अली खान ‘आदिपुरुष’मध्येही व्हिलन म्हणून झळकणार आहे. (Saif Ali Khan to play Lankesh in Prabhas starer Adipurush)

रामायणावर आधारित ‘आदिपुरुष’ चित्रपटातील ‘लंकेश’ म्हणजेच रावणाची भूमिका सैफ अली खान साकारणार आहे. ‘7000 वर्षांपूर्वी जगातील सर्वात बुद्धीमान असूर अस्तित्त्वात आला!’ अशा शब्दात ओम राऊतनेच सैफच्या व्यक्तिरेखेची ओळख करुन दिली.

तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित “तान्हाजी: द अनसंग वॉरियर” या ओम राऊत दिग्दर्शित चित्रपटातही सैफने खलभूमिका साकारली होती. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात उदयभानसिंग राठोडची व्यक्तिरेखा सैफने साकारली. या चित्रपटातील अभिनयाबद्दल सैफचे कौतुकही झाले होते. तर ‘ओमकारा’ चित्रपटात लंगडा त्यागी ही खल भूमिका पहिल्यांदा साकारलेल्या सैफने अनेक पुरस्कारांवर नावही कोरले होते.

अभिनेता प्रभास ‘आदिपुरुष’ची मुख्य भूमिका साकारणार आहे. टी सीरीजचे भूषण कुमार या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होणार असून हिंदीशिवाय तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या चार दाक्षिणात्य भाषांमध्ये रिलीज होईल.

ओम राऊतचा परिचय

लेखक-दिग्दर्शक ओम राऊत हा प्रख्यात निर्मात्या नीना राऊत आणि ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांचा चिरंजीव. लहानपणी करामती कोट (1993) या सिनेमात त्याने अभिनय केला होता. ‘सिटी ऑफ गोल्ड’ या सिनेमाच्या निर्मितीतून 2010 मध्ये त्याने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेल्या ‘लोकमान्य : एक युगपुरुष’ सिनेमाचे दिग्दर्शन त्याने केले. तर नुकत्याच आलेल्या अजय देवगणच्या ‘तान्हाजी’च्या दिग्दर्शनातून त्याने बॉलिवूडमध्येही ठसा उमटवला.

संबंधित बातमी :

मराठमोळा शिलेदार करणार प्रभासला दिग्दर्शन, ‘आदिपुरुष’ची घोषणा 

(Saif Ali Khan to play Lankesh in Prabhas starer Adipurush)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.