पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानची मशागत, ट्रॅक्टर चालवून शेतीकामाला हातभार
सलमान खान सध्या त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर शेतीची मशागत करत आहे (Salman Khan drive tractor during Farming at Panvel Farmhouse).
नवी मुंबई : लॉकडाऊन सुरु झाल्यापासून बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या पनवेल येथील फॉर्महाऊसवर आपला वेळ घालवत आहे. आजूबाजूला डोंगर आणि निसर्गरम्य परिसर आणि त्यामध्ये वसलेले सलमानचे फार्महाऊस तब्बल दीडशे एकर जागेवर पसरले आहे. सलमान तिथे सध्या शेतीची मशागत करत आहे (Salman Khan drive tractor during Farming at Panvel Farmhouse).
सलमान खानने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो शेतात काम करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सलमानचे चाहते त्याचं भरभरुन कौतुक करताना दिसत आहेत. सलमान संपूर्ण कुटुंबासोबत पनवेलच्या फार्महाऊसवर वेळ घालवत आहे. याशिवाय त्याने सध्या शेती कामात स्वत:चं मन रमवलं आहे. त्याने सोशल मीडियावर शेतात काम करत असल्याचे काही व्हिडीओ, फोटो शेअर केले आहेत (Salman Khan drive tractor during Farming at Panvel Farmhouse).
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
अलिकडेच सलमानने शेतात लावणी करताना आणि चिखलात बसलेला असे दोन फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता त्याने ट्रॅक्टर चालवत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरत असून प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सलमान स्वत: ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. तसंच तो ट्रॅक्टरखाली उतरुन शेताची न्याहाळणीदेखील करत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने ‘शेती’ असं कॅप्शन दिलं आहे.
पहिले ट्रॅक्टरच्या मागे नांगर लावून सलमान शेतात नांगरणी करत दिसत आहे. त्यानंतर तो स्वत: ट्रॅक्टरही चालवत आहे. याआधी त्याने देशातील शेतकऱ्यांना सलाम करण्यासाठी एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये सलमान चिखलाने माखलेला दिसला. सलमानचा हा फोटोदेखील प्रचंड व्हायरल झाला होता.