समंथा-नागाचे पुन्हा नांदा सौख्यभरे?, सोशल मीडियावरची पोस्ट डिलीट केल्याने चर्चांना उधाण
समंथा आणि नागा पुन्हा एकत्र येणार असल्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
दिल्ली – साऊथमध्ये कमी कालावधीत प्रसिध्दी मिळालेली अनेक कपल आहेत. त्यापैकी समंथा-नागा (Samantha Akkineni -Naga Chaitanya) हे सुध्दा एक लोकप्रिय कपल एकेकाळी होते. साऊथमध्ये (south) यांच्या जोडीला लोकांच्या अधिक पसंतीची होती. त्यांचे पुन्हा पॅचअप (patch up) झाल्याची चाहत्यांमध्ये (fan) चर्चा आहे. चाहत्यांमध्ये ही चर्चा कशी सुरू झाली, याचं कारण काय आहे ? हे आपण पाहूया.
साऊथ मधलं लोकप्रिय कपल घटस्फोट घेत असल्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. कारण दोघांनीही आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली होती. तसेच आम्ही दोघं एकमेकांच्या विचाराने घटस्फोट घेत असल्याचे म्हणाले होते.
यामुळे झाली चर्चा
समंथा आणि नागा पुन्हा एकत्र येणार असल्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. त्यांचं कारणंही तसंच आहे. समंथाने विभक्त होत असल्याची पोस्ट सोशल मीडियावरून हटवली आहे. त्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येत असल्याची अफवा पसरवली आहे.
ही पोस्ट केली डिलीट
View this post on Instagram
समंथाने इंस्टाग्रामवरची पोस्ट डिलीट केल्यामुळे चाहत्यांकडून चर्चा करण्यात आली आहे. तसेच त्यामध्ये हे दोघेही एकत्र झाले असून त्या दोघांनी अद्याप अशी कोणतीचं माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळं ही केवळ अफवा असल्याचं समजलं जात आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
समंथा-नागाची प्रेम कहानी
2009 मध्ये दोघांची भेट झाली, त्यानंतर 2013 मध्ये दोघेही एक चित्रपट करत असताना त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली. शुटिंग दरम्यान दोघांच्याही मनात एकमेकाबद्दल आदर आणि प्रेम निर्माण झालं होतं. 2015 मध्ये नागा चैतन्यचा वाढदिवस असतो. त्यावेळी समंथाने “हॅप्पी बर्थडे टू माय फेवरेट पर्सन, फॉरेवर अँड ऑल्वेज , ग्रेट इअर इट्स गोइंग टू बी”असं टविट् केलं. त्यानंतर चाहत्यांनी चर्चेला सुरूवात केली. 2016 मध्ये दोघांनीही एकमेकांवर प्रेम असल्याचं जाहीर केलं. 6 ऑक्टोबर 2017 मध्ये त्यांनी गोव्यात विवाह केला. ऑक्टोबर 2021 मध्ये ते विभक्त होत असल्याचे त्यांनी सोशल मीडियावरती चाहत्यांना सांगितले.