US Election | ‘समोसा कॉकस’चा दबदबा; भारतीय वंशाच्या चौघांची हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हजमध्ये फेरनिवड

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रचंड चुरस रंगलेली असतानाच भारतीयांसाठी मात्र आनंदाची बातमी आहे. डेमोक्रॅट्स पक्षाचे भारतीय वंशाचे चारही उमेदवार हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हसाठी निवडून आले आहेत.

US Election | 'समोसा कॉकस'चा दबदबा; भारतीय वंशाच्या चौघांची हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हजमध्ये फेरनिवड
Follow us
| Updated on: Nov 04, 2020 | 1:53 PM

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रचंड चुरस रंगलेली असतानाच भारतीयांसाठी मात्र आनंदाची बातमी आहे. डेमोक्रॅट्स पक्षाचे भारतीय वंशाचे चारही उमेदवार हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हसाठी निवडून आले आहेत. अॅमी बेरा, प्रमिला जयापाल, रो खन्ना आणि राजा कृष्णमूर्ती असं या विजयी उमेदवारांचं नाव आहे. विशेष म्हणजे राजा कृष्णमूर्ती यांनी या चारही उमेदवारांना ‘समोसा कॉकस’ असं नाव दिलं होतं.

अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या मतदारांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे डेमोक्रॅट्ससह रिपब्लिकन पार्टीच्या नेत्यांनी भारतीय वंशाची मते मिळावी म्हणून कंबर कसली होती. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हसाठी झालेल्या निवडणुकीत राजा कृष्णमूर्ती यांनी प्रिस्टन नील्सन यांना पराभूत केलं. तर रो खन्ना यांनी रिपब्लिकन पार्टीचे भारतीय वंशाचे उमेदवार रितेश टंडन यांना पराभूत केलं. रो खन्ना यांचा कॅलिफोर्नियातील हा सलग तिसरा विजय आहे. तर डॉ. अॅमी बेरा यांचा हा पाचवा विजय आहे.

अमेरिकेच्या संसदेत हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ह हे कनिष्ठ सभागृह असतं. तर सीनेट हे वरिष्ठ सभागृह आहे. दोन्ही सभागृह मिळून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड करतात. त्यासाठी 14 डिसेंबर रोजी मतदान झालं होतं.

‘ही’ राज्य ठरवणार नवा राष्ट्राध्यक्ष

दरम्यान, रिपब्लिकन पक्षाने गेल्या वेळी नवमतदारांना टार्गेट केले होते. म्हणजे, ज्या मतदारांनी पूर्वी कधीच मतदान केले नव्हते. 2016 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी ओहायो, मिशिगन, विस्कॉन्सिन, पेनिसिल्वेनिया आणि फ्लोरिडामध्ये विजय मिळवला होता. यावेळी सर्वांचे लक्ष या राज्यांकडे आहे.

प्यू रिसर्च सेंटरच्या मते, अमेरिकेतील 67% मतदार श्वेतवर्णीय आहेत. ट्रम्प समर्थक असलेल्या बिगर महाविद्यालयीन सुशिक्षित मतदारांची टक्केवारी 40% आहे. देशातील हिस्पॅनिक मतदार लोकसंख्येच्या 13% आहेत. तर फ्लोरिडामधील क्यूबान समुदायाव्यतिरिक्त इतर मतदार सामान्यत: डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थक असतात. कृष्णवर्णीय मतदार हे डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थक असतात.

अशा परिस्थितीत रिपब्लिकन पक्ष अशा विशिष्ट पद्धतीने मतदान न करणाऱ्या मतदारांना आकर्षित करण्याची रणनीती आखते. यातील बहुतांश मतदार श्वेतवर्णीय श्रमिकवर्गातील असतात. रिपब्लिकन पक्षाने रॅलीमध्ये सर्वसाधारणपणे मतदान न करणार्‍या वर्गाला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला.

2016 मध्ये असे दिसून आले होते की ट्रम्प यांना व्हाईट इव्हॅंजेलिकल प्रोटेस्टंट (White Evangelicals Protestants) वर्गाचे 80% मतं मिळाली होती. दक्षिणेकडील राज्यांमध्ये 21%, मिडवेस्टमध्ये 14%, पश्चिमेमध्ये 13% आणि ईशान्येकडील 8% इतके मतदार स्वत:ला इव्हँजेलिकल प्रोटेस्टंट मानतात. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे सहन्यायमूर्ती अ‍ॅमी कोनी बॅरेट यांच्या नियुक्तीमुळे ट्रम्पना अधिक पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा आहे. गर्भवती महिलांना गर्भपात करण्याच्या स्वातंत्र्यावरील घटनात्मक हक्काबाबत कोर्टाच्या निर्णयावर बॅरेट यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

संबंधित बातम्या:

Joe Biden | ट्रम्प यांच्याशी कडवी झुंज; जाणून घ्या कोण आहेत जो बायडन?

US Election | कोरोनाच्या लसीवर डोनाल्ड ट्रम्प यांचं भवितव्य अवलंबून?

US Election 2020 LIVE : दोन विशाल राज्य गमावूनही ट्रम्पना विजय शक्य, 2016 च्या रणनीतीची पुनरावृत्ती होणार?

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.