AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केळ्याच्या तंतूपासून पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड, 2 वर्ष पुनर्वापर

दिल्लीच्या आयआयटीच्या दोन विद्यार्थ्यांनी यावर उपाय (first Reusable Sanitary Pads) शोधून काढला आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी केळ्याच्या तंतूपासून सॅनिटरी नॅपकिन तयार केले आहे.

केळ्याच्या तंतूपासून पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड, 2 वर्ष पुनर्वापर
Follow us
| Updated on: Aug 21, 2019 | 1:09 PM

नवी दिल्ली : देशभरात शहरासह खेडेगावातील लाखो महिला मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकिनचा (Sanitary Pads) वापर करतात. सॅनिटरी नॅपकिनमुळे पर्यावरणला हानी पोहोचत असल्याचा दावा केला जातो. मात्र नुकतंच दिल्लीच्या आयआयटीच्या दोन विद्यार्थ्यांनी यावर उपाय (first Reusable Sanitary Pads) शोधून काढला आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी केळ्याच्या तंतूपासून सॅनिटरी नॅपकिन तयार केले आहे. या सॅनिटरी नॅपकिनमुळे पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचणार नाही याची काळजी विशेष काळजी घेण्यात आली आहे.

केळ्याच्या तंतूपासून बनवण्यात आलेले हे सॅनिटरी नॅपकिन तुम्ही 120 वेळा म्हणजे तब्बल 2 वर्षे धुवून वापरु शकता. तसेच या नॅपकिनचा वापर केल्याने स्त्रियांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होणार नाही. या सॅनिटरी नॅपकिनची किंमत 100 रुपये आहे.

दिल्लीच्या आयआयटीमध्ये शिकणाऱ्या अर्चित अग्रवाल आणि हैरी सहरावत या दोन विद्यार्थ्यांनी विविध शिक्षकांच्या मदतीने हे सॅनिटरी नॅपकिन तयार केले आहे. हे दोघेही बी टेक च्या चौथ्या वर्षात शिकत आहेत. या दोघांनी मिळून साफे (Sanfe) नावाची एक स्टार्टअप कंपनी सुरु केली आहे. या कंपनीच्या माध्यामातून त्यांनी हे सॅनिटरी नॅपकिन तयार केले आहे.

त्यांनी केलेल्या या कामगिरीमुळे त्या दोघांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आयआयटीच्या डिझाईन विभागाचे सहाय्यक शिक्षक श्रीनिवास वेंकटरमन याबाबत बोलताना म्हणाले, स्वास्थ्य आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टींचा विचार केला. तर ही युक्ती फार फायदेशीर ठरणार आहे. हे सॅनिटर नॅपकिन बनवण्यासाठी जवळपास दीड लाख रुपयांचा खर्च आला आहे. तसेच याचे पेटेंटही आम्ही केले आहे.

असे तयार झाले सॅनिटरी नॅपकिन

अर्चित अग्रवाल आणि हैरी सहरावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सॅनिटरी नॅपकिनमध्ये चार स्तर आहेत. पॉलिएस्टर पिलिंग, केळ्याचे तंतू, कॉटन पॉलियूरेथेन लेमिनेट याचा वापर करुन हे सॅनिटरी नॅपकिन तयार केले आहे.

आपण केळं खाल्ल्यानंतर त्याची साल फेकून देतो. मात्र त्यात फायबर असते. याचाच वापर करत आम्ही या केळ्याच्या साली मशीनमध्ये टाकून सुकवल्या. यातील फायबरवर ओलसरपणा शोषून घेणारा एक पॉलिएस्टर पिलिंग म्हणजे एक कपडा टाकला. तसेच लीकेज थांबण्यासाठी कॉटन पॉलियूरेथेन लेमिनट (हॉस्पिटलमध्ये प्रयोगद्वारे वापरण्यात येणारे एक केमिकल) वापरण्यात आले आणि याचाच वापर करुन सॅनिटरी नॅपकिनला कवर देण्यात आले.

सॅनिटरी नॅपकिनमुळे पर्यावरणाला धोका

सध्या बाजारात उपलब्ध असणारे सॅनिटरी नॅपकिन हे प्लास्टिक आणि सिंथेटीकद्वारे बनवलेले असते. त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन वापरल्यानंतर ते फेकून देतात. त्यामुळे ते नष्ट होण्यास 50 ते 60 वर्ष लागतात. तसेच नाल्यात किंवा समुद्रात फेकल्याने त्याचे अनेक दुष्परिणामही होतात. विशेष म्हणजे बाजारात वापरलेले सॅनिटरी पॅड जाळल्यानंतर त्यातून रासायनिक धूर बाहेर पडतो. ज्यामुळे वायू प्रदूषण होते. देशभरात जवळपास 336 मिलियन महिलांमध्ये 36 टक्के म्हणजेच 121 मिलियन महिला डिस्पोजेबल सॅनिटरी पॅडचा वापर करतात.

दरम्यान आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले सॅनिटरी पॅड हे ऑनलाईन ई-कॉर्मस वेबसाईटवर उपलब्ध आहेत. यातील एका पॅकेटमध्ये दोन सॅनिटरी पॅड आहेत. ज्याची किंमत 199 रुपये आहे. याचा वापर केल्यानंतर तुम्ही ते थंड पाण्यात धुवून दोन वर्षापर्यंत वापरु शकता.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.