Girish kuber : कुबेरांवरील शाईफेकीचा संजय राऊतांकडून निषेध, शिवसेनेकडून संभाळून लिखानाचाही सल्ला

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गिरीश कुबेरांवर झालेल्या शाईफेकीचा निषेध नोंंदवला आहे. गिरीश कुबेर यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही वादग्रस्त लिखान केले होते त्यावरून हा सर्व प्रकार सुरू झाला आहे.

Girish kuber : कुबेरांवरील शाईफेकीचा संजय राऊतांकडून निषेध, शिवसेनेकडून संभाळून लिखानाचाही सल्ला
sanjay raut
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 5:01 PM

नाशिक : नाशिकमध्ये साहित्य संमेलाच्या ठिकाणी गिरीश कुबेरांवर झालेल्या शाईफेकीनंतर राज्यात पुन्हा राजकारण तापलं आहे. साहित्य संमेलन सुरू असताना असा प्रकार घडल्यानं त्यावर राजकीय गोटातून दोन्ही बाजूने प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गिरीश कुबेरांवर झालेल्या शाईफेकीचा निषेध नोंंदवला आहे. गिरीश कुबेर यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही वादग्रस्त लिखान केले होते त्यावरून हा सर्व प्रकार सुरू झाला आहे.

संजय राऊतांकडून शाईफेकीचा निषेध

साहित्य संमेलाच्या ठिकाणी असा प्रकार करणे अत्यंत चुकीचं आहे, यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे तर गिरीश कुबेर यांच्या लिखानात काही चुका असतील तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, असं मत संजय राऊत यांनी नोंदवलं आहे. मी ते लिखान अजून मी वाचलं नाही, त्यांच्या लिखानाबाबत मतभेद असू शकतात, तसेच छत्रपती संभाजी महाराज आपले दैवत आहेत त्यांच्याबाबत कुणीही आक्षेपार्ह लिखान करणे चुकीचे आहे, तसे लिखान झाल्यास लोकांना वेदना होतात असंही राऊत म्हणाले आहेत.

कुबेरांवरील शाईफेकीवर मनिषा कायंदेंची प्रतिक्रिया

गिरीश कुबेर यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल पुस्तक लिहिले आहे, यात आक्षेप आहे लिखाण आहे असे समजते. छत्रपती संभाजी महाराज हे प्रेरणास्थान आहेत. राष्ट्रपुरुषांबद्दल लिहिताना जिथे अनेक लोकांच्या श्रद्धेचा विषय असताना इतिहासाचे दाखले देताना खूप सांभाळून लिहिलं बोललं गेलं पाहिजे, असे मत शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी व्यक्त केले आहे. लोकांच्या भावना दुखावल्या जातात याचा विचार केला गेला पाहिजे. असंही कायंदे म्हणाल्या आहेत

शाईफेख हेही उत्तर नाही

तसेच शाईफेक करणे हे उत्तर नाही अशाही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचा एक ठरलेला फॉर्म्युला आहे, त्यांनी केलं तर ते पुण्य दुसऱ्यांनी केलं तर ते पाप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ मुंबईत येतात आणि बॉलिवूडला उत्तर प्रदेशमध्ये नेण्यासाठी अनेक आमिष दाखवतात. अशी टीकाही मनिषा कायंदे यांनी केली आहे. मुंबईचं आर्थिक महत्व कमी करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Kishori Pednekar | ओमिक्रॉन येऊ नये यासाठी प्रयत्नशील : किशोरी पेडणेकर

Girish kuber : हे लिहल्यामुळे गिरीश कुबेरांवर नाशकात शाईफेक, काय होता मजकूर? वाचा सविस्तर

Bengal Crime: बंगालमध्ये अंधश्रद्धेचा गाठला कळस! वृद्ध महिलेला चेटकीण ठरवून मारहाण

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.