साताऱ्यातील मायणी पक्षी अभयारण्याचा राखीव वनक्षेत्रात समावेश
खटावसारख्या दुष्काळी भागातील मायणी या पक्षी अभयारण्याच्या विकासासाठी मदत होणार आहे. (Satara Mayani Bird Sanctuary Included in the Reserved forest area)
सातारा : साताऱ्यातील मायणी पक्षी अभयारण्य आणि जोर जांभळी या भागांचा राखीव वनक्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील 7 हजार 377 हेक्टर क्षेत्राला संवर्धन राखीव वनक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. वन विभागाच्या या नव्या निर्णयामुळे खटावसारख्या दुष्काळी भागातील मायणी या पक्षी अभयारण्याच्या विकासासाठी मदत होणार आहे. (Satara Mayani Bird Sanctuary Included in the Reserved forest area)
मायणी भागात असलेल्या तलावांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो आणि इतर परदेशी पक्षांचे आगमन होते. या पक्षाचे छायाचित्रण करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने हौशी फोटोग्राफर येत असतात. पण गेल्या काही वर्षांपासून या अभयारण्याकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी या भागात येणाऱ्या पक्ष्यांचा अधिवास कमी होत चालला होता.
पण या भागातील नागरिकांनी आणि वन्यप्रेमींनी केलेल्या प्रयत्नांमुळे प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. या मायणी पक्षी अभयारण्याचा राखीव वनक्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता या अभयारण्याला वन विभागाकडून निधी मिळणार असल्याने या दुर्लक्षित अभयारण्याचा विकास होण्यासाठी मदत होणार आहे.
वन विभागाचा हा निर्णयाची माहिती मायणी गावात समजल्यानंतर गावागावात पेढे वाटण्यास सुरुवात झाली आहे. मायणी पाठोपाठ महाबळेश्वर पट्ट्यातील जोर जांभळी भागाचा देखील राखीव वनक्षेत्रात समावेश झाला आहे. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातील प्राण्यांचा देखील अधिवास वाढणार आहे. एकूणच मायणी पक्षी अभयारण्य आणि जोर जांभळीबाबत झालेल्या निर्णयामुळे निसर्गासह त्यातील प्राण्यांना चांगला फायदा होणार आहे. (Satara Mayani Bird Sanctuary Included in the Reserved forest area)
टाटा मोटर्सच्या गाड्यांवर ‘एवढ्या’ हजारांची सूट, हॅरिअर, नेक्सॉनवरही जबरदस्त ऑफर#tatamotors #Harrier https://t.co/mSKd7vrSgy
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 7, 2020
संबंधित बातम्या :
भारत बंदमुळे राज्यात 5 बाजार समित्या बंद, या जिल्ह्यांचा आहे समावेश
Farmers protest: नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट उद्या बंद; माथाडी कामगारही संपावर