PHOTO | साताऱ्यात उदयनराजेंचा पराभव करणारे खासदार श्रीनिवास पाटील चक्क शेताच्या बांधावर!
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी चक्क शेतात उतरुन भातकापणी केली. (Satara MP Srinivas Patil Farming).
श्रीनिवास पाटील हे तेच खासदार आहेत ज्यांनी साताऱ्यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीत संभाजीराजे भोसले यांचा पराभव केला होता. 18 ऑक्टोबर 2019 रोजी शरद पवारांनी उभ्या पावसात न थांबता, न थकता, पावसाच्या धारा परतवून लावत उपस्थितांशी संवाद साधला होता. श्रीनिवास पाटलांसाठी शरद पवारांनी घेतलेली ती सभा निर्णायक ठरली होती.
Follow us
मातीशी जुळलेले घट्ट नातं मातीपासून कधीच वेगळं करु शकत नाही. सध्या साताऱ्यात त्याचाच प्रत्येय बघायला मिळतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी चक्क शेतात उतरुन भातकापणी केली.
श्रीनिवास पाटील हे तेच खासदार आहेत ज्यांनी साताऱ्यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीत संभाजीराजे भोसले यांचा पराभव केला होता. 18 ऑक्टोबर 2019 रोजी शरद पवारांनी उभ्या पावसात न थांबता, न थकता, पावसाच्या धारा परतवून लावत उपस्थितांशी संवाद साधला होता. श्रीनिवास पाटलांसाठी शरद पवारांनी घेतलेली ती सभा निर्णायक ठरली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे एवढे मोठे नेते शेतात सहकुटुंब भातकापणी करत असल्याची बातमी सध्या संपूर्ण साताऱ्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
पाटील यांनी पत्नीसह त्यांचा उच्च शिक्षित मुलगा सारंग पाटील, सून, नातवंडे आणि काही शेतमजूर यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष भातकापणीला प्रारंभी केला. प्रथम नारळ फोडून त्यांनी शेताचे पूजन केले.
शेतीमध्ये असणारी आवड आणि आपल्या मातीशी जुळलेले बंध ही परंपरा पुढील पिढीमध्येसुद्धा कायम राहावी, या उद्देशाने सहपरिवार शेतीचं काम करत असल्यास त्यांनी सांगितलं
सध्या खरीप हंगामातील पिकांच्या काढणीच्या कामांना सर्वत्र गती आली आहे. आम्ही देखील सर्व कुटुंबीय मिळून आमच्या शेतातील भात काढणीला सुरुवात केली असून, राजकीय क्षेत्रात काम करत असताना शेतीसाठी वेळ फारच कमी मिळतो. नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सतत सुरू असतात. तरी देखील मी मूळचा शेतकरी असल्याने आम्ही शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत असतो. विविध पद्धतीच्या भाजीपाल्याची लागवड केली जाते, अशी माहिती श्रीनिवास पाटील यांनी दिली.