समुद्रावर अधिराज्य गाजवण्यासाठी रशियाची डॉल्फिन फौज, अमेरिकेला मोठं आव्हान
समुद्रात शत्रूची शिकार करण्यासाठी रशियानं एक डॉल्फिन फौज तयार केली आहे (Russia Military marine mammal). सध्या सीरियात गृहयुद्ध सुरु आहे. त्यासाठीच रशियानं आपल्या पाणबुड्यांसोबत हे प्रशिक्षित डॉल्फीन तैनात केल्याचं समोर आलं आहे
मॉस्को : समुद्रात शत्रूची शिकार करण्यासाठी रशियानं एक डॉल्फिन फौज तयार केली आहे (Russia Military marine mammal). रशियाचे सर्वेसर्वा पुतीन यांच्या या अनोख्या सेनेला शत्रूंवर वार करण्यासाठी ट्रेन केलं गेलं आहे. या घातक आणि अनोख्या सैनिकांचा खुलासा एका सॅटेलाईटनं केला आहे. सध्या सीरियात गृहयुद्ध सुरु आहे. त्यासाठीच रशियानं आपल्या पाणबुड्यांसोबत हे प्रशिक्षित डॉल्फीन तैनात केल्याचं समोर आलं आहे (Russia Military marine mammal).
रशियानं आपल्या टार्टस नेव्ही बेसवर डॉल्फिन सेना मैदानात उतरवली आहे. अमेरिकेला आव्हान देण्यासाठी 1990 मध्येच रशियानं मरीन मॅमल नावाचा प्रोजेक्ट सुरु केला होता. याच मरीन मॅमल प्रोजेक्टद्वारे डॉल्फिनला शत्रूंवर हल्ला करण्याचं ट्रेनिंग दिलं गेलं. जेव्हा रशिया डॉल्फिन्सना ट्रेनिंग देतं होतं, त्याचदरम्यान एक डॉल्फिन चुकून थेट नॉर्वेच्या समुद्रात पोहोचलं होतं. तेव्हा पहिल्यांदाच रशियाचा हा गुप्त प्रोजेक्ट जगासमोर आला.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
या डॉल्फिन्सना प्रामुख्यानं दोन गोष्टींसाठी ट्रेन केलं गेलं. पहिलं म्हणजे पानबुड्यांचं संरक्षण करणं आणि दुसरं म्हणजे बंदराच्या जवळच्या भागात शत्रू नौदलाच्या सैनिकांवर हल्ला करणं. जाणकारांच्या माहितीनुसार, सध्या सीरियाच्या भागात रशियानं ज्या पाणबुड्या तैनात केल्या आहेत, त्यांच्या सुरक्षेसाठी डॉल्फिनसुद्धा गस्त घालत आहेत.
डॉल्फिनपाठोपाठ रशियन सैन्य बेलुगा नावाच्या व्हेललासुद्धा ट्रेन करत आहेत. व्हेल हे डॉल्फिनच्या तुलनेत आकारानं मोठे असले, तरी डॉल्फिनपेक्षा कमी वेगानं प्रवास करतात. त्याचाही खुलासा सॅटेलाईटद्वारेच झाला आहे.
व्हेल अत्यंत कमी तापमानातसुद्धा जीवंत राहतात. त्यामुळे बर्फाळ पाण्यात हेरगिरी करण्यासाठी रशिया व्हेलचा पुरेपूर वापर करतो. सीरियावरुन अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांमध्ये वाद आहेत. त्यामुळे रशियापाठोपाठ आता अमेरिका आणि चक्क इराणनंसुद्धा मरीन मॅमल प्रोजेक्टचं काम सुरु केलं आहे.
अमेरिकन नौदलाचे डॉल्फिनसुद्धा समुद्रात पेरलेल्या स्फोटकांचा शोध घेण्यात माहिर आहेत. मात्र, रशियाची डॉल्फिन आर्मी अमेरिकेहूनही प्रगत आणि धोकादायक मानली जाते. त्यामुळे समुद्रावर अधिराज्य गाजवण्यासाठी रशियानं उतरवलेल्या या नवीन योद्ध्यांना तोंड देणं अमेरिकेसाठी सर्वात मोठं आव्हान बनलं आहे.
हेही वाचा : चीनचे सर्व फासे उलटे पडणार, भारतीय वायुदलात आकाशातला सर्वात मोठा योद्धा दाखल होणार