सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांसमोर अडचणींचा डोंगर!, अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत 13 हजाराहून अधिक तक्रारी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या तब्ब्ल १३ हजारापेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारींचं वर्गीकरण करुन त्यावर निर्णय घेण्याचं काम पुणे विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांसमोर अडचणींचा डोंगर!, अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत 13 हजाराहून अधिक तक्रारी
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 9:32 AM

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या परीक्षेतील घोळ काही कमी होताना दिसत नाही. अंतिम वर्षाच्या परीक्षेतील अडचणींबाबत विद्यार्थ्यांकडून आतापर्यंत 13 हजारापेक्षा अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या अडचणी दूर करण्याचं काम विद्यापीठाकडून सुरु करण्यात आलं आहे. परीक्षेदरम्यान लॉगिन न होणं, प्रश्न न दिसणं, आकृत्या न दिसणं, उत्तरपत्रिका सबमिट न होणं, सर्व्हर जाणं अशा अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला होता. (Savitribai Phule Pune University last year exam above 13 thousand complaints)

अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भातील अडचणीच्या 13 हजारापेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्यानं ऑनलाईन परीक्षेचा कसा फज्जा उडाला हेच पाहायला मिळतं. दरम्यान, विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या तक्रारींचं विभाजन करुन त्यावर निर्णय घेण्यात काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून करण्यात येत आहेत. विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या जवळपास अडीच लाख विद्यार्थांची परीक्षा घेतली जात आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं ही परीक्षा सुरु आहे. मात्र, ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना एक गुगल फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या फॉर्मद्वारे विद्यार्थ्यांना आपल्या अडचणी विद्यापीठ प्रशासनाकडे नोंद करता येत आहे.

ऑफलाईन परीक्षेतही अडचण!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षेला 12 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली होती. मात्र, पहिल्याच दिवशी ऑफलाईन परीक्षेचा खोळंबा झालेला पाहायला मिळाला होता. पुणे विद्यापीठाकडून ऑनलाईन पाठवल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकांची प्रिंट करण्यासाठी आवश्यक असणारा ‘ओटीपी’च आला नाही. त्यामुळे पहिल्या सत्रातील ऑफलाईन परीक्षा ठप्प झालेली पाहायला मिळाली.

अन्य विद्यापीठांमध्येही घोळांची मालिका!

सावित्रीबाई फुले पुणे विद्याप्रमाणेच मुंबई विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेदरम्यान मोठा घोळ पाहायला मिळाला होता. त्यामुळं अंतिम वर्षाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

संबंधित बातम्या:

online exams | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची तांत्रिक अडचण मिटली, परीक्षेची नवी तारीख जाहीर

पुणे विद्यापीठात ऑफलाईन परीक्षेचा खोळंबा, प्रश्नपत्रिकांच्या प्रिंटसाठी ‘ओटीपी’च मिळाला नाही

‘लिटिल मोअर’ला नो मोअर चान्स! ऑनलाईन परीक्षा घोळामुळे मुंबई विद्यापीठाने काम काढून घेतलं!

Savitribai Phule Pune University last year exam above 13 thousand complaints

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.