अलिबागमध्ये दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार, सात जण अटकेत

दिव्यांग मुलीवर सात जणांनी वारंवार लैंगिक अत्याचार (Sexual assault with disabled girl) करुन तिला गरोदर केल्याची धक्कादायक घटना अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे घडली आहे.

अलिबागमध्ये दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार, सात जण अटकेत
Follow us
| Updated on: Apr 03, 2020 | 4:19 PM

रायगड : दिव्यांग मुलीवर सात जणांनी वारंवार लैंगिक अत्याचार (Sexual assault with disabled girl) करुन तिला गरोदर केल्याची धक्कादायक घटना अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे घडली आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींना आज अलिबाग न्यायालयाने 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे (Sexual assault with disabled girl).

अलिबाग तालुक्यातील रेवदंडा गावात पीडित मुलगी आपल्या आई वडिलांसोबत राहते. ही मुलगी दिव्यांग आहे. याच गोष्टीचा फायदा घेऊन तिच्या परिसरात राहणाऱ्या सात जणांनी सात महिने वारंवार आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर मुलीची तब्येत बिघडली. तिला त्रास जाणवू लागला.

पीडित मुलीच्या घरच्यांनी तिला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासले असता पीडित मुलगी ही गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी पालकांना सांगितले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यामध्ये परिसरातील सात जणांनी पीडित मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

रेवदंडा पोलिसांनी सात जणांना तातडीने अटक केली असून त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास डीवायएसपी सोनाली कदम करीत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.