शरद पवारांनी ‘वोट जिहाद’वरून फडणवीसांना झापलं; हिंदू- मुस्लिमांमधील वातावरण…

Sharad Pawar On Devendra Fadnavis Vote Jihad Statement : शरद पवारांनी 'वोट जिहाद' च्या विधानावरून उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांवरही शरद पवारांनी निशाणा साधला आहे. शरद पवार नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

शरद पवारांनी 'वोट जिहाद'वरून फडणवीसांना झापलं; हिंदू- मुस्लिमांमधील वातावरण...
देवेंद्र फडणवीस, शरद पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 11:05 AM

निवडणुकीत वोट जिहाद होत असल्याचा आरोप भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला जातो. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सुनावलं आहे. जिहाद हा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी काढला. काही मतदारसंघात मायनॉरिटीने महाविकास आघाडीने मतदान केलं. पुण्याच्या काही भागात विशिष्ट समाज आहे. हिंदू समाज आहे. त्यांनी भाजपला मतदान केलं तर आम्हाला सवय आहे. असंच होतं. पण याचा अर्थ जिहाद होतो असं नाही. फडणवीस यांनी जिहाद शब्द वापरला. फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या निवडणुकीला धार्मिक कलर देण्याचा प्रयत्न केला. आपल्याला यश येणार नाही याची खात्री झाल्याने हिंदू मुस्लिम विषय घेऊन बोलत आहेत. हिंदू आणि मुस्लिमांमधील वातावरण खराब करत आहे, असं शरद पवार म्हणालेत.

पवारांचा नरेंद्र मोदींवर निशाणा

मी अनेक पंतप्रधानांची भाषणं ऐकली. निवडणुकीच्या काळात. मी कॉलेजात शिकत असताना नेहरुंचे भाषण पुण्यात ऐकलं. त्यानंतर सर्व पंतप्रधानांची भाषणं ऐकली. साधारण उद्याचा विकास कसा असेल. काय कार्यक्रम असेल हे मांडतात. हे पहिले पंतप्रधान मोदी आहेत त्यांनी सुरुवातच केली ४०० पारची. ४०० पार कशासाठी?, अशा शब्दात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांवर टीका केली आहे.

नरसिंहराव पंतप्रधान होते. आमची मेजॉरीटी नव्हती. त्यांना बहुमत नव्हतं. तरीही सरकार चालवलं. सरकार चालतं. तरीही मोदी ४०० पार मागत होते. याचा अर्थ त्यांचे सहकारी घटनाबदलाचं बोलत होते. संविधानात दुरुस्तीबद्दल बोलत होते. त्यामुळे आम्हाला लोकांना सांगावं लागलं की सरकार काय करणार आहे. आपल्याला भूमिका घ्यायला पाहिजे, असं पवार म्हणाले.

किती जागा जिंकणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळतेय. अशातच कोणत्या आघाडीला आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? याबाबत तर्क लावले जात आहेत. याचबाबत शरद पवारांना विचारण्यात आलं. तेव्हा मी काही ज्योतिषी नाही. निकालानंतर बघू किती जागा येतील, असं शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल का? यावरही मी काही ज्योतिषी नाही, असं पवार म्हणाले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.