अतिवृष्टी ते राजकारण; शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे

आर्थिक संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने कर्ज काढून त्यांना मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली.

अतिवृष्टी ते राजकारण; शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे
Follow us
| Updated on: Oct 19, 2020 | 9:52 AM

तुळजापूर : अतिवृष्टीमुळे राज्यावर आजपर्यंतचे सर्वात मोठे आर्थिक संकट ओढावलं आहे. या आर्थिक संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने कर्ज काढून त्यांना मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत विनंती करणार आहोत. राज्य सरकारने जास्तीत जास्त कर्ज काढावे, असेही पवार यांनी म्हटले. ते आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. शरद पवार हे रविवारी मराठवाडा दौऱ्यावर होते. त्यानंतर आज त्यांनी एक पत्रकार परिषद घेत महत्त्वाचे मुद्दे मांडले. (Sharad Pawar press conference 10 important points Maharashtra weather)

पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

– कोरोना संकटात मुख्यमंत्र्यांना एका ठिकाणी बसण्याची विनंती केली आणि आढावा घ्यायला सांगितला. इतर मंत्री फिल्डवर होते, आम्ही दिलेल्या जबाबदारीप्रमाणे मुख्यमंत्री काम करत आहेत.

– विधानसभेत जाऊन 53 वर्ष झाली, मी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. संकटात मी बसू शकत नाही, माझ्या हातात प्रशासनाची जबाबदारी नाही.

– संकटातून बाहेर काढण्यासाठी नियम बदलणे गरजेचं आहे. नेत्यांच्या दौऱ्याचा पूर सुरू झाला अशी टीका होते. मात्र, याकडे पॉझिटिव्ह पाहिलं पाहिजे. शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे मागे उभे राहिले पाहिजे.

– पीक विमा ऑनलाईनला शिथिलता द्यावी. पीक विमा भरण्याच्या प्रमाणात वाढ करायला हवी. निकषांच्यानुसार फोटो अपलोड करणे शक्य नाही, मी स्वतः फोटो अपलोड करु शकत नाही. (Sharad Pawar press conference 10 important points Maharashtra weather)

– नदी ओढयाकाठी असलेल्या विहिरी, मोटारी वाहून गेल्या. जनावरे वाहून गेली, घरांचे नुकसान झाले. पण मी आलो म्हणजे लगेच मदत मिळेल असे नाही.

– सध्या राज्यावर मोठे आर्थिक संकट, कर्ज काढल्याशिवाय पर्याय नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शक्य तितकं जास्त कर्ज घ्यावं अशी विनंती करणार

– उस्मानाबाद, नांदेड, लातूर, पंढरपूर, इंदापूर या भागात मोठं नुकसान, उस्मानाबाद हा पूर्ण जिल्हा संकटात

– शेतीच्या नुकसानीची मोठी किंमत महाराष्ट्राला मोजावी लागली. काही जिल्ह्यांत नुकसानीची टक्केवारी जास्त

– राजकारणात मतभेद असतात. निवडणुकीमध्ये एकमेकांची काळजी घेतो. मात्र, संकटात सोबत असतो. केंद्र मदत करेल. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना फोन केल्याचे ऐकलं ते सकारात्मक असतील.

– शासकीय वेतन देण्यासाठी 12 हजार कोटी दरमहा कर्ज घ्यावे लागले. राज्याला अशी वेळ का आली?

इतर बातम्या – 

पुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

Weather Alert: पुढच्या 24 तासांत राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, हवामान खात्याचा इशारा

(Sharad Pawar press conference 10 important points Maharashtra weather)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.