Rayat Shikshan Sanstha | रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड

रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची फेरनिवड झाली आहे (Sharad Pawar Re-elected as President of Rayat Shikshan Sanstha)

Rayat Shikshan Sanstha | रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड
Follow us
| Updated on: Jun 28, 2020 | 12:06 AM

सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची फेरनिवड झाली आहे (Sharad Pawar Re-elected as President of Rayat Shikshan Sanstha). तर चेअरमनपदी पुन्हा डॉक्टर अनिल पाटील यांची वर्णी लावण्याचं निश्चित करण्यात आलं. अनिल पाटील हे कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील यांचे नातू आहेत. संस्थेच्या सचिवपदी प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर यांची निवड झाली. त्याचबरोबर पाच उपाध्यक्ष, 24 जणांची मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाली (Sharad Pawar Re-elected as President of Rayat Shikshan Sanstha).

अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचा एकमेव अर्ज होता. मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्यपदी उपमुख्यमंत्री अजित पवार, उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, मंत्री विश्वजीत कदम, रामशेठ ठाकूर यांच्यासह 24 जणांची निवड झाली. यामध्ये 12 सदस्य हे राजकीय क्षेत्रातील तर 11 सदस्य हे शिक्षकांमधून निवडले गेले.

हेही वाचा : 1962 मध्येही भारताचा भूभाग गेला, ही राजकारणाची वेळ नाही, पवारांचा काँग्रेसला टोला?

रयत शिक्षण संस्थेच्या सहसचिवपदी (उच्च शिक्षण) प्राचार्य डॉक्टर प्रतिभा गायकवाड आणि माध्यमिक सहसचिवपदी मुख्याध्यापक नागपुरे यांची निवड निश्चित झाली. ही निवड अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे-पाटील, मंत्री बाळासाहेब पाटील, विश्वजीत कदम, रामशेठ ठाकूर, एन डी पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाली.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुढील बैठकीत कार्याध्यक्ष निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. त्याचबरोबर सहसचिव आणि विभागीय अध्यक्षांची निवड पहिल्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत होणार आहे.

सचिवपदी निवड झाल्यानंतर डॉक्टर शिवणकर यांनी हा माझा बहुमान असल्याचं सांगितलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यापासून डिजिटल ऑनलाईन शिक्षण पोहोचवण्याचा कार्य सुरु आहे. यासंदर्भात सर्व्हे सुरु असल्याचं शिवणकर यांनी सांगितलं.

हेही वाचा : लायकी पाहून बोलावं, सूर्यावर थुंकल्यास थुंकी तोंडावर उडते : अजित पवार

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.