Stock Market Update Today: आरबीआयचा ‘जैसे थे’चा निर्णय, शेअर बाजारात उसळी, सेंन्सेक्स 400 अंकांनी वधारला!
सेंन्सेक्स 460 अंकांच्या वाढीसह 58926 अंकावर बंद झाला. निफ्टी 142 अंकांच्या वाढीसह 17606 वर पोहोचला. अर्थसंकल्पानंतर (UNION BUDGET) रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाकडं अर्थजगताच्या नजरा लागल्या होत्या.
नवी दिल्लीः रिझर्व्ह बँकेच्या चलन विषयक धोरणानंतर (RESERVE BANK OF INDIA) शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेंन्सेंक्स व निफ्टी दोन्ही आघाड्यांवर तेजीचं वातावरण पाहायला मिळालं. सेंन्सेक्समध्ये 450 हून अधिक अंकांची तेजी दिसून आली. तर निफ्टीनं 17600 अंकांचा टप्पा पार केला. आज (गुरुवारी) निफ्टीवर बँक,फायनान्शियल आणि आयटी निर्देशांकांची कामगिरी वरचढ ठरली. तिन्ही निर्देशांकात 1 टक्क्यांची तेजी नोंदविली गेली. सेंन्सेक्स 460 अंकांच्या वाढीसह 58926 अंकावर बंद झाला. निफ्टी 142 अंकांच्या वाढीसह 17606 वर पोहोचला. अर्थसंकल्पानंतर (UNION BUDGET) रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाकडं अर्थजगताच्या नजरा लागल्या होत्या. रिझर्व्ह बँकेनं रेपो दर (REPO RATE) स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच आर्थिक विकास दराची अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळे शेअर बाजारात सकारात्मक परिणाम नोंदविला गेला.
आजचे वधारणीचे गेनर्स (T0P GAINERS)
1. ओएनजीसी (3.14%) 2. टाटा स्टील (2.13%) 3. इन्फोसिस (1.86%) 4. एचडीएफसी बँक (1.84%) 5. एसबीआय लाईफ (1.83%)
आजचे घसरणीचे शेअर्स (TOP LOOSERS)
1. मारुती सुझुकी (-1.61%) 2. बीपीसीएल (-1.58%) 3. आयओसी (-0.91%) 4. श्री सिमेंट (-0.86%) 5. अल्ट्रा-टेक सिमेंट (-0.39%)
आरबीयचं ‘जैसे थे’?
अर्थसंकल्पानंतर उद्योगजगताच्या नजरा आरबीआयच्या चलनविषयक धोरणाकडे लागल्या होत्या. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काही दिवसांतच बाजारात पडझड नोंदविली गेली. रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक समितीची बैठकीला गेल्या सोमवारपासून सुरुवात झाली होती. अर्थतज्ज्ञांनी रिझर्व्ह बँकेचं धोरण स्थिर राहणार असल्याचा अंदाज यापूर्वीच वर्तविला होता. रेपो दरात वाढ केल्यास शेअर बाजार घसरणीचा अधिका धोका असल्याचं मानलं गेलं होतं. आरबीआयनं धोरण जैसे थेच ठेवल्यानं बाजारात तेजीचं चित्र पाहायला मिळालं.
गुंतवणुकदारांनो ‘हे’ पाऊल उचला!
एस्कॉर्ट सिक्युरिटीजचे रिसर्च हेड आसिफ इक्बाल यांनी टीव्ही 9 हिंदीशी बोलताना शेअर बाजारातील घसरणीला वाढत्या दरवाढीची कारणे सांगितली आहेत. रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर मार्केटची दिशा स्पष्ट होईल असे म्हटले होते. अर्थतज्ज्ञांच्या मतानुसार, गुंतवणुकदारांनी घसरणीवेळी खरेदी करायला हवी. गुंतवणुकदारांना एसआयपी खरेदी करायला हवी असा सल्ला दिला होता.
संबंधित बातम्या
GOLD PRICE TODAY: भाववाढीचा चौकार, पुणे-नाशकात सोनं सुसाट, 400 रुपयांची वाढ
New ITR filing: सुधारित आयकर विवरणपत्रासाठी किती रिकामा होईल खिसा?