अंगावर पेटत्या निखाऱ्यांचा वर्षाव, कोकणाच्या शिमगोत्सवात थरकाप उडवणारी प्रथा

सर्वात मोठा श्रद्धेचा आणि परंपरेचा सण म्हणून कोकणात शिमगोत्सवाकडे पाहिले जाते. कोकणात (Shimga Holi Festival in Ratnagiri)अनेक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आहेत.

अंगावर पेटत्या निखाऱ्यांचा वर्षाव, कोकणाच्या शिमगोत्सवात थरकाप उडवणारी प्रथा
Follow us
| Updated on: Mar 09, 2020 | 11:02 PM

रत्नागिरी : सर्वात मोठा श्रद्धेचा आणि परंपरेचा सण म्हणून कोकणात शिमगोत्सवाकडे पाहिले जाते. कोकणात (Shimga Holi Festival in Ratnagiri) अनेक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आहेत. त्या आजही मोठ्या भक्तिभावाने जपल्या जातात. एकमेकाला जोरजोरात ‘फाका’ घालणे, होम पेटविणे, गोमुचा नाच, अशा अनेक गोष्टींसाठी शिमगा हा सण प्रसिद्ध आहे. मात्र, चिपळूण तालुक्‍यातील सावर्डे येथील प्रथा काही वेगळीच आणि अंगावर शहारे आणणारी आहे. होलटा शिमगा असे या प्रथेचं नाव आहे. ज्यांनी ही प्रथा पाहिली असेल, अशांचा ‘होलटे शिमग्या’ने अक्षरशः थरकाप उडतो. कारण यात चक्क पेटते निखारे एकमेकांवर मारले जातात.

रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सवाची शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम आहे. मात्र शिमगोत्सवातील सावर्डे गावातील एक जीवघेणी प्रथा-परंपरा अनेकांचा थरकाप उडवते. ‘होलटे शिमगे’ असे त्या परंपरेचे नाव आहे. यात पेटती लाकडे एकमेकांवर फेकून मारण्यात येतात. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे ‘होलटे होम’ हा खेळ खेळला जातो.

या खेळात मानपानाप्रमाणे गावातील दोन गट परस्परांसमोर उभे राहून लाकडे पेटवतात. नंतर ढोल-ताशांच्या गजरात आरोळ्या ठोकत सुमारे तीस फुटाच्या अंतरावरुन ती पेटती लाकडे (होलटे) पाच वेळा एकमेकांवर फेकतात. मात्र ही जळती लाकडे अंगावर पडून कोणीही जखमी किंवा भाजत नाही. शेवटी उरलेली लाकडे एकत्र करुन त्यांची होळी केली जाते.

या होलटे होम होळीचे काही नियम आहेत. दोन गट एक मेकांसमोर उभे राहतात. लहान मोठे यांच्या हातात जळका होलटा म्हणजे लाकूड असतं. प्रत्येक वाडीतली मुलं या खेळात सहभागी होतात. ढोल-ताशा आणि सनईच्या वादनात होलटे खेळणाऱ्या खेळाडूंच स्वागत होतं. पायात चप्पल न घालता एकमेकांवर हे होलटे फेकले जातात. वाईट इच्छा किंवा मद्यपान केलेल्या व्यक्तीच्याच माथी हे पेटते लाकूड पडते आणि त्याला शिक्षा मिळते, असा या प्रथेतील समज आहे. त्यामुळे अनेक चाकरमानीसुद्धा हा खेळ खेळण्यासाठी येतात.

पाच वेळा एकमेकांवर हे पेटते निखारे फेकले जातात. एका वेळी एका बाजूने एकच गट हे पेटते निखारे फेकतो. या ‘होलटे शिमग्याचे’ वैशिष्ट्ये म्हणजे पेटती लाकडे एकमेकांवर मारुनही कोणीही जखमी होत नाही. त्यामुळे अगदी चाकरमानी सुद्धा ही धाडसी होळी खेळतात.

शिमग्यातली प्रथा म्हणून ही होळी खेळली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी पुणे आणि मुंबईवरुन अनेक चाकरमानी येतात. अवघ्या पाच मिनिटांच्या खेळानंतर, त्याठिकाणी एकही लाकूड किंवा निखारा आढळून येत नाही. होळी उत्सवात अनेक परंपरा पहायला मिळतात. मात्र थोडी अघोरी का होईना सावर्डेतील हा होलटे होम शिमग्यात खेळलाच जातो.

संबंधित बातमी :  PHOTO : कुठे कोरोनासूर, कुठे हिंगणघाटचा हैवान, राज्यात होळीचा उत्साह

मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.