नटीसाठी छाती बडवणाऱ्यांना हाथरसचं तिकीट काढून द्या; राऊतांचा टोला

सुशांतप्रकरणाचा तपास पोलीस चांगला करत होते. त्याच्या आत्महत्येचं कारणही पोलिसांना माहीत होतं. शवविच्छेदन अहवालात सर्व नमूद होतं. पण मृत्यूनंतर कुणाचं चारित्र्यहनन नको म्हणून पोलीस काही बोलत नव्हते. आम्हीही मृत्यूनंतर कुणाची बदनामी नको म्हणून बोललो नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

नटीसाठी छाती बडवणाऱ्यांना हाथरसचं तिकीट काढून द्या; राऊतांचा टोला
Follow us
| Updated on: Oct 05, 2020 | 1:32 PM

मुंबई: एका नटीच्या बेकायदा बांधकामासाठी छाती बडवणाऱ्यांनी आणि नटीने हाथरसवर बोलावं. बलरामपूरवर बोलावं. या नटीसह तिच्या सर्व समर्थकांना आता हाथरसला जाण्याचं तिकीट काढून द्या, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला. ( sanjay raut slams kangana ranaut)

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिनेत्री कंगना रानौत आणि भाजपवर थेट नाव न घेता टीका केली. एका नटीचं बेकायदा बांधकाम वाचवण्यासाठी काही लोकांनी छाती बडवली. तिच्यासाठी आकांडतांडव केलं. हाथरस आणि बलरामपूर घटनेवर हे लोक का बोलत नाहीत. त्या नटीनंही या घटनेवर बोललं पाहिजे. या घटनेबद्दल तिचं मत काय आहे हे देशाला कळू देत. त्यांना हाथरसचा रस्ता माहीत नसेल तर आम्ही सांगू. हाथरसला कसं जायचं आणि कुठे थांबायचं? याची सविस्तर छापिल माहिती आणि हाथरसला जाण्याचं तिकिट या लोकांना देण्यास आमच्या लोकांना सांगणार आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

सुशांतप्रकरणाचा तपास पोलीस चांगला करत होते. त्याच्या आत्महत्येचं कारणही पोलिसांना माहीत होतं. शवविच्छेदन अहवालात सर्व नमूद होतं. पण मृत्यूनंतर कुणाचं चारित्र्यहनन नको म्हणून पोलीस काही बोलत नव्हते. आम्हीही मृत्यूनंतर कुणाची बदनामी नको म्हणून बोललो नाही. मात्र, सीबीआयकडे तपास गेल्यानंतर ड्रग्स आणि चरस सर्व काही बाहेर आलं. आता तर एम्सच्या डॉक्टरांनीही सुशांतने आत्महत्या केल्याचा अहवाल दिला आहे. एम्सचे डॉक्टर हे काही शिवसैनिक नाहीत, असं सांगतानाच सुशांतप्रकरणावरून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भरपूर प्रयत्न झाला. त्यांचं हे षडयंत्र उधळलं गेलं. आमच्यासाठी खड्डा खोदणारे स्वत: खड्ड्यात पडले, असा टोलाही त्यांनी लगावला.

जयंत चौधरी यांच्यावरही हल्ला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्ला झालाच नाही, असं भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलं होतं. त्याबाबत विचारलं असता राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया देणं टाळलं. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना धक्काबुक्की झाली नाही म्हणणाऱ्यांनी देशाचे माजी माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचे नातू जयंत सिंह यांच्यावरही उत्तर प्रदेश पोलिसांनी हल्ला केलाय हे विसरू नये, असंही त्यांनी सांगितलं. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर झालेली कारवाई हीच ठोस करावाई आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बाकी कारवाई करत नाहीत, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. ( sanjay raut slams kangana ranaut)

संबंधित बातम्या:

सुशांतप्रकरणी शिवसेना नेत्यांना आत्मसाक्षात्कार झालाय का?: भाजपचा खोचक सवाल

आता सुशांतप्रकरणाचा अहवाल अंध भक्त नाकारणार काय?, शिवसेनेचा सवाल

एका नटीसाठी एक कायदा, बेटीच्या देहाची मात्र विटंबना : संजय राऊत

( sanjay raut slams kangana ranaut)

परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.