इंधन दरवाढीचा भडका, शिवसैनिक गॅस सिलिंडर घेऊन रस्त्यावर; मुंबईत जोरदार आंदोलन

पेट्रोल, डिझेल आणि घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने त्याच्या निषेधार्थ आज शिवसैनिकांनी संपूर्ण मुंबईत जोरदार आंदोलन केलं. (shivsena agitation against fuel price hike in mumbai)

इंधन दरवाढीचा भडका, शिवसैनिक गॅस सिलिंडर घेऊन रस्त्यावर; मुंबईत जोरदार आंदोलन
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 6:30 PM

मुंबई: पेट्रोल, डिझेल आणि घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने त्याच्या निषेधार्थ आज शिवसैनिकांनी संपूर्ण मुंबईत जोरदार आंदोलन केलं. ‘रद्द करा रद्द करा, इंधन दरवाढ रद्द करा’, ‘या सरकारचं करायचं काय?, खाली डोकं वर पाय’, अशी घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी संपूर्ण मुंबई दणाणून सोडली. या आंदोलनात शिवसेनेच्या रणरागिणीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. स्वत: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (shivsena agitation against fuel price hike in mumbai)

शिवसेनेचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी मुंबई महापालिका मुख्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. या आंदोलनात शेकडो शिवसैनिक सहभागी झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी शिवसैनिकांनी 2010 पासून ते आतापर्यंतच्या इंधनाच्या दराचे आकडे असलेले फलक हवेत उंचावत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. या आंदोलनात महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी जाल्या होत्या.

दादरच्या प्रीतम हॉटेलसमोर एल्गार

शिवसेनेचे आमदार आणि विभागप्रमुख सदा सरवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दादर टीटी आणि प्रीतम हॉटेलजवळ शिवसेनेने जोरदार आंदोलन केलं. शिवसैनिकांनी हातात फलक आणि भगवे झेंडे घेऊन रस्त्यावरच जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे या परिसरात काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. या आंदोलकांना पांगवताना पोलिसांचीही मोठी दमछाक झाली होती.

दादर टीटीला रास्तारोको

प्रीतम हॉटेलसमोर आंदोलन सुरू असतानाच शिवसैनिकांच्या एका गटाने दादर टीटीकडे कूच करून तिथेही प्रचंड निदर्शने केली. आक्रमक शिवसैनिकांनी दादर टीटी येथे रास्ता रोको केल्याने काहीकाळ वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती.

लालबागमध्ये गॅस सिलिंडर रस्त्यावर

लालबाग येथे महापौर किशोरी पेडणकेर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो महिला शिवसैनिकांनी भाग घेतला. या महिला शिवसैनिकांनी घरातील गॅस सिलिंडर रस्त्यावर आणून सरकार विरोधात संताप व्यक्त केला. स्वत: महापौर किशोरी पेडणेकर यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आक्रमक महिला शिवसैनिकांनी यावेळी रस्ता रोखून धरल्याने दक्षिण मुंबईत काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

दिल्ली-पंजाबमध्ये जे झालं ते महाराष्ट्रातही होईल: श्रद्धा जाधव

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ केली आहे. हे सर्व त्रासदायक आहे. दरवाढीचा सर्वाधिक त्रास गृहिणींना होत आहे. त्यांचं किचनचं बजेट कोलमडलं आहे. दिवसे न् दिवस वाढणारे हे भाव कमी करा. स्थिर करा, नाही तर जे दिल्ली-पंजाबमध्ये झालं तसंच आंदोलन महाराष्ट्रातही होईल, असा इशारा माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी दिला. आम्ही आंदोलने केली, नाही केली तरी आमच्यावर टीका होते. शिवसेना सत्तेत असूनही आंदोलन करते, अशी टीका केली जाते आणि आंदोलन नाही केलं तर वाघाची बकरी झाली म्हणून डिवचलं जातं. विरोधकांच्या जीभेला हाड नाही, असा घणाघातही त्यांनी केला. (shivsena agitation against fuel price hike in mumbai)

संबंधित बातम्या:

इंधन दरवाढ सुरुच, 16 दिवसात पेट्रोल प्रतिलिटर नऊ रुपयांनी महाग

(shivsena agitation against fuel price hike in mumbai)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.