शिवसेना आमदार भास्कर जाधव यांची नाराजी दूर होईना, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी
नाराज असलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी मारली. (Shivsena MLA Bhaskar Jadhav Absent Cm Uddhav Thackeray Meeting)
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील शिवसेना आमदारांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला नाराज असलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी दांडी मारली. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चा आहेत. (Shivsena MLA Bhaskar Jadhav Absent Cm Uddhav Thackeray Meeting)
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाधव यांना पक्षप्रवेशाचं निमंत्रण दिलं होतं. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी गुहागर मतदारसंघातून विजय मिळवला. आमदार झाल्यानंतर तसंच शिवसेना सत्तेत आल्यानंतर त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. तेव्हापासून ते सेनेवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत.
मंत्रिपद न मिळाल्याने आपली नाराजी त्यांनी याअगोदर देखील बोलून दाखवली होती. राष्ट्रवादीत असताना त्यांनी महत्त्वाची खाती सांभाळलेली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सेनापक्षप्रमुख आपल्याला मंत्रिपद देतील, अशी आशा त्यांना होती.
कोकणातल्या विकासकामासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीला कोकणातील सेना आमदार उपस्थित होते. मात्र भास्कर जाधव यांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला.
भास्कर जाधव हे यापूर्वी शिवसेनेत होते. मात्र काही कारणांनी त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. राष्ट्रवादीत असताना त्यांना महत्त्वाच्या खात्यांवर तसंच मंत्रिपदावर कामाची संधी मिळाली. तसंच राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावर देखील त्यांना काम करण्याची संधी शरद पवारांनी दिली होती. (Shivsena MLA Bhaskar Jadhav Absent Cm Uddhav Thackeray Meeting)
संबंधित बातम्या
मुंबईत अडकलेल्या कोकणवासीयांना घरी जाण्याची परवानगी द्या, भास्कर जाधव यांची मागणी
पक्षांतरानंतरही मैत्र कायम, अजितदादांच्या गाडीचं भास्कर जाधवांकडून सारथ्य