VIDEO : विदारक वास्तव ! वृद्धेला प्रचंड ताप, हतबल नातेवाईकांनी रुग्णालयात नेण्यासाठी ओढ्याच्या पाण्यातून चालवत नेलं

जिंतूर तालुक्यात सर्वदूर पाऊस झाल्यामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत होते. मात्र दहेगाव येथे पूल नसलेल्या ओढ्याला पूर आल्यामुळे आजारी महिलेस उपचारासाठी चक्क कंबरेएवढ्या पाण्यातून चालवत न्यावे लागले.

VIDEO : विदारक वास्तव ! वृद्धेला प्रचंड ताप, हतबल नातेवाईकांनी रुग्णालयात नेण्यासाठी ओढ्याच्या पाण्यातून चालवत नेलं
मन पिळवटून टाकणारं वास्तव, वृद्धेला रुग्णालयात नेण्यासाठी ओढ्याच्या पाण्यातून चालवत नेण्याची वेळ
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 3:29 PM

परभणी : राज्यात विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका राहिल्या की नेतेमंडळींकडून आश्वासनांचा अक्षरश: पाऊस पडतो. पण एकदा निवडणूक झाली की त्याच नेत्यांना त्यांच्या आश्वासनांचा विसर पडतो. नेतेमंडळींकडून सर्वसामान्यांना चांगले रस्ते, एका गावाला दुसऱ्या गावाशी जोडणारा पूल यांची फक्त दिवा स्वप्न दाखवले जाते. पण या स्वप्नांची पूर्तता केली जात नाही. नागरिकांना मुलभूत नागरी सुविधाही दिल्या जात नाहीत. त्याचाच फटका आज जिंतूरमधील एका कुटुंबाला बसला आहे. जिंतूरच्या दहेगाव येथील एका आजारी वृद्धेला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी तिच्या कुटुबियांना ओढ्याच्या डोक्याभर पाण्यातून चालवून रुग्णालयात नेले. या घटनेची संपूर्ण जिंतूर तालुक्यात चर्चा सुरु आहे.

थोडाफार पाऊस पडला तरी रस्ते बंद

जिंतूर तालुक्यात सर्वदूर पाऊस झाल्यामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत होते. मात्र दहेगाव येथे पूल नसलेल्या ओढ्याला पूर आल्यामुळे आजारी महिलेस उपचारासाठी चक्क कंबरेएवढ्या पाण्यातून चालवत न्यावे लागले. जिंतूर तालुक्यातील अनेक गावातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य बघायला मिळतंय. तर काही गावांना जाण्यासाठी पक्का रस्ताच नाही. शिवाय छोटे ओढे, नाल्यांवर पूल नाहीत. त्यामुळे थोडाफार पाऊस पडला तर रस्ते बंद होतात. यामुळे काही गावांचा संपर्क तुटतो. असाच प्रकार जिंतूर तालुक्यातील दहेगाव गावात बघायला मिळाला. पूल नसल्यामुळे गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वयोवृद्ध महिलेची प्रकृती गंभीर

गावातील वयोवृद्ध महिला हरिबाई ढोणे यांना 21 जुलैला प्रचंड ताप आला होता. मात्र, त्याचवेळी गावाबाहेर असलेल्या ओढ्याला प्रचंड पूर आलेला होता. हरिबाई यांना तालुक्यातील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाणं जास्त जरुरीचं होतं. पण ओढ्याला इतका पूर आला होता की थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. हरिबाई यांच्या नातेवाईकांनी ओढ्याचे पाणी कमी होईल म्हणून काही काळ वाट बघितली. पण ताप वाढत असल्यामुळे महिलेची प्रकृती गंभीर होऊ लागली.

अखेर महिलेला ओढ्याच्या पाण्यातून चालत नेलं

अखेर हरिबाई यांचे नातेवाईक दिलीप ढोणे, संतोष ढोणे यांनी ओढ्याच्या पाण्यातून महिलेला दवाखान्यात नेण्याचं ठरवलं. त्यानुसार हरिबाई यांच्या नातेवाईकांनी गुडघ्याएवढ्या पाण्यातून महिलेला दवाखान्यातून नेलं. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. दरम्यान गेल्या 20 ते 25 वर्षांपासून दहेगाव येथील नागरिक पूल मिळावा मागणी करूनही राजकीय नेते आणि प्रशासनाला जाग येत नसल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय.

संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :

हेही वाचा :

चिपळूणमध्ये पावसाचा हाहा:कार; 7 बोटींद्वारे बचावकार्य सुरु, आतापर्यंत 75 लोक सुरक्षितस्थळी- अनिल परब 

बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस, उल्हास नदीला पूर, बाजारपेठेला फटका, दुकानांत पाणी घुसलं!

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.