पुण्यात तीन लाखांहून अधिक उद्योग सुरु, कंपन्यांचे 30 ते 70 टक्के क्षमतेने काम सुरु
राज्यातील लॉकडाऊनमध्ये टप्प्या टप्प्याने शिथीलता आणली जात (Small and Big industries start in Pune Division) आहे.
पुणे : राज्यातील लॉकडाऊनमध्ये टप्प्या टप्प्याने शिथीलता आणली जात (Small and Big industries start in Pune Division) आहे. पुणे विभागात तीन लाखांहून अधिक उद्योग सुरु करण्यात आले आहे. तर अनेक कंपन्यांचे तीस ते सत्तर टक्के क्षमतेने काम सुरु आहे. लॉकडाऊन निर्बंध शिथिल झाल्यानंतर उद्योगधंद्यांची चाकं फिरू लागली आहेत. पुणे विभागात साधारण 3 लाख 65 हजाराहून अधिक उत्पादन आणि सेवा उद्योग (Small and Big industries start in Pune Division) आहेत.
विभागात पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यात लघु, सूक्ष्म, मध्यम, सेवा, उद्योग आणि मोठे उत्पादन सुरू करण्यात आले आहेत. विभागात 60 टक्के उद्योग सेवा क्षेत्रातील आहेत. पुणे जिल्ह्यात दोन लाख 34 हजार लघु सुक्ष्म मध्यम उद्योग आहेत. तर मोठे उद्योग समूह 832 असून ऑटोमोबाईल, फोर्जिंग, इलेक्ट्रॉनिक, कृषी प्रक्रिया उद्योग यांचा समावेश आहे.
राज्यात निर्बंध शिथिल झाल्यानंतर परप्रांतीय मजुरांची विभागात येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. पुणे जिल्ह्यात दोन लाख लघु सुष्म आणि मध्यम सेवा उद्योग आहेत. तसेच जिल्ह्यात 832 मोठे उद्योग आहेत.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!
कोल्हापूर जिल्ह्यात 30 हजार लघु सूक्ष्म आणि मध्यम सेवा उद्योग आहेत. तर जिल्ह्यात 91 मोठे उद्योग आहेत.
सांगली जिल्ह्यात 20 हजार 851 लघु आणि मध्यम सेवा उद्योग सुरू झाले आहेत. त्यासोबत जिल्ह्यात 68 मोठे उद्योगही सुरु झालेत.
सोलापूरमध्ये 15 हजार लघु आणि मध्यम उद्योग सुरू झाले आहेत. जिल्ह्यात 76 मोठे उद्योग सुरु झाले आहेत.
सातारा जिल्ह्यातही 12 हजार लघु सूक्ष्म आणि मध्यम सेवा उद्योग सुरु करण्यात आले आहेत. जिल्ह्यात 17 मोठे उद्योग झाले आहेत.
संबंधित बातम्या :
Lockdown | …तर पुण्यात पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा