Video Ravi Rana on CM Hanuman Chalisa : तर मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसा वाचू, आ. रवी राणांचा इशारा, उद्या हनुमान जयंतीला काय होणार?

हनुमान जयंतीला हनुमान चालीसाचं वाचन केलं जातं. रवी राणा हे अमरावतीत हनुमान चालीसाचं वाचन करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही हनुमान जयंतीनिमित्त हनुमान चालीसा वाचावा. अन्यथा आम्ही मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचू, असा इशारा रवी राणा यांनी दिलाय.

Video Ravi Rana on CM Hanuman Chalisa : तर मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसा वाचू, आ. रवी राणांचा इशारा, उद्या हनुमान जयंतीला काय होणार?
हनुमान चालीसा वाचनावर आमदार रवी राणा नेमकं काय म्हणाले, Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 3:37 PM

अमरावती : आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) म्हणाले, हनुमान जयंतीच्या पर्वावर उद्या सकाळी मी आणि खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) हनुमानाच्या मंदिरात हनुमान चालीसा वाचणार आहोत. हनुमानाच्या मंदिरात भोंगा लावणार आहोत. हनुमान चालीसा वाचन करत असताना भोंगा नसलेल्या मंदिरांसाठी भोंग्यांचं वाटपसुद्धा करणार आहोत. राममंदिरात सुंदरकांड झालं पाहिजे. यासाठी राम मंदिरातसुद्धा आम्ही भोंग्यांचं वाटप करणार आहोत, असं राणा यांनी ठणकावून सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी सुद्धा हनुमान जयंतीच्या पर्वावर हनुमान चालीसा वाचला पाहिजे. उद्धव ठाकरे हनुमान चालीसा वाचत नसतील, तर बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला आहे. तो विसर जागृत करण्यासाठी हनुमान जयंतीनंतर मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचू. बाळासाहेबांच्या विचारांचा त्यांना जो विसर पडला आहे. याची उद्धव ठाकरे यांना जाणीव करून देऊ. यातून एक धार्मिक संदेश देणार असल्याचं आमदार रवी राणा म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडल्याची टीका आमदार रवी राणा यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालीसा वाचला नाही तर मी व खासदार नवनीत राणा मुख्यमंत्र्याच्या मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचू, असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला. त्यामुळं उद्या हनुमान जयंतीला काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्या अमरावतीत पगडीवाले हनुमान मंदिरात सकाळी 9 ते 11 या वेळात हनुमान चालीसाचे पठण करून स्वतः मंदिरावर भोंगे चढवणार आहेत. उद्या हनुमान जयंती दिनी राणा दाम्पत्याचे हनुमान चालीसा पठण करणार आहेत.

पाहा व्हिडीओ

संस्कृती रक्षणासाठी हनुमान चालीसा वाचन

येत्या हनुमान जयंतीला हनुमान मंदिरात जाऊन मी आणि आमदार रवी राणा आम्ही दोघेही हनुमान चालीसाचे पठण करणार आहोत. तसेच हनुमान मंदिरावर भोंगा देखील लावणार आहोत, असं वक्तव्य अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे. दोनच दिवसापूर्वी खासदार नवनीत राणा यांनी रवीनगरमधील हनुमान मंदिर परिसरात सुरू असलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात जाऊन हजारो महिलांसोबत दोन तास बसून हनुमान चालीसेचे पठण केले होते. त्यानंतर आता पुन्हा हनुमान जयंतीला मंदिरात जाऊन हनुमान चालीसा पठण करून मंदिरावर भोंगा सुद्धा लावणार असल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मी पहिल्यांदा हनुमान चालीसा वाचणार नाही. अनेक वेळा हनुमान चालीसा वाचलेलं आहे. आपल्या संस्कृतीला पुढे नेण्याचं काम करत आहोत. दरवर्षी रवीनगरमध्ये हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम होत असल्याचंही खासदार नवनीत राणा यांनी सांगितलं.

Video Navneet Rana | हनुमान जयंतीला हनुमान चालीसा पठण करणार, मंदिरावर भोंगे लावणार; खासदार नवनीत राणा यांचे वक्तव्य

Video Yavatmal Dog | वणीतील रॅलीत कुत्रा भगव्या वस्त्रात; विजय चोरडियांच्या कुत्र्याचा भगव्या वस्त्रात सहभाग

Buldana | आमदार संजय कुटे यांचे शेगाव पोलिसांवर गंभीर आरोप; भाजप, विहिंप, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल का?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.