‘समाजानं वाळीत टाकलं’, कोरोना बाधित रुग्णांच्या कुटुंबियांची तक्रार
कोरोना बाधित रुग्णांच्या कुटुंबियांवर समाजाकडून बहिष्कार टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे (Corona infected Family). याप्रकरणी रुग्णांच्या कुटुंबीयांनी वकिलांच्या माध्यमातून थेट विभागीय आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
पुणे : पुण्यात 8 रुग्णांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला (Corona Infected Family). या रुग्णांवर नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहे. या रुग्णांची तब्येतही सुधारत असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगतात. मात्र, यापैकी एका रुग्णाच्या कुटुंबियांना मनस्ताप सहन करावा लागत आहे (Corona Infected Family). रुग्णाच्या कुटुंबियांवर समाजाकडून बहिष्कार टाकून वाळीत टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी कुटुंबीयांनी वकिलांच्या माध्यमातून थेट विभागीय आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
“रुग्णांच्या कुटुंबीयांना समाजाकडून वाईट वागणूक मिळत आहे. त्यांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास, फिरण्यास आणि पाणी भरण्यास मज्जाव केला जात आहे. सर्व कामे घरातच करावी. घरातील भांडी आणि धुण्याचे पाणीही बाहेर फेकू नये, असं बजावलं जात आहे. समाजाकडून अशाप्रकारची वागणूक फक्त एकाच कुटुंबाला नाही तर इतर रुग्णांच्या कुटुंबीयांनाही दिली जात आहे, असा दावा वकील अॅड. किशोर पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे 10 रुग्ण
महाराष्ट्रात कोरोनाचे 10 रुग्ण बाधित आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली. “महाराष्ट्रात आजपर्यंत कोरोनाचे 10 पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत (CM Uddhav Thackeray on Corona). परंतु, या 10 रुग्णांमध्ये कोरोनाचे लक्षणे दिसत नाहीत. कोरोनामुळे घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. मात्र, दक्षता घ्यावी. गर्दी टाळली गेलीच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत गर्दी होता कामा नये. पुढचे 15 ते 20 दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.