सोलापुरात कोरोनाचा विळखा वाढला, दिवसभरात 10 नवे कोरोनाबाधित रुग्ण

राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे (Solapur Corona Update). सोलापूर शहरात आज 10 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

सोलापुरात कोरोनाचा विळखा वाढला, दिवसभरात 10 नवे कोरोनाबाधित रुग्ण
Follow us
| Updated on: Apr 20, 2020 | 9:02 PM

सोलापूर : राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे (Solapur Corona Update). कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. सोलापूर शहरात आज 10 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या 25 वर पोहोचली आहे. यापैकी 2 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 23 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली (Solapur Corona Update).

सोलापुरात आज प्राप्त झालेल्या 67 पैकी 10 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले, तर 57 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. यामध्ये पाच्छा पेठ परिसरातील 6 तर बापुजी नगर, कुर्बान हुसेन नगर, भद्रावती पेठ आणि जगन्नाथ नगर येथील प्रत्येकी एक असे रुग्ण आढळले आहेत.

ज्या भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत त्याभागात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय या भागातील लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

सोलापुरातील तेलंगी पाछा पेठ परिसरात एका किराणा दुकानदाराचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा अहवाल पॉजिटिव्ह आला होता. या दुकानदारामार्फतच सोलापुरात कोरोनाने शिरकाव केला होता. त्यामुळे त्याच्या संपर्कातील लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यात एका महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर तिच्या संपर्कातील इतर व्यक्तींचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. यामध्ये 10 जणांचे अहवाल पॉजिटिव्ह आले होते.

दरम्यान, महाराष्ट्रात आज (20 एप्रिल) दिवसभरात नव्या 466 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्याचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत आज 308 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 4 हजार 666 वर पोहोचला आहे. तर राज्यात आज 9 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना मृत्यूंची संख्या ही 232 वर पोहोचली आहे.

राज्यात कोरोनाचे कोठे किती रुग्ण?

कोरोनाबाधितांची अपडेट आकडेवारी

Edit
जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 2724 30 132
पुणे (शहर+ग्रामीण) 563 19 50
पिंपरी चिंचवड 48 1
ठाणे (शहर+ग्रामीण) 130 4
नवी मुंबई 72 8 3
कल्याण डोंबिवली 69 2
उल्हासनगर 1
भिवंडी 5
मीरा भाईंदर 71 2
पालघर 17 1
वसई विरार 85 1 3
रायगड 13
पनवेल 29 1 1
नाशिक (शहर +ग्रामीण) 9
मालेगाव 78 6
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 29 3 2
धुळे 1 1
जळगाव 2 1
नंदूरबार 1
सोलापूर 15 2
सातारा 11 2
कोल्हापूर 6 1
सांगली 27 4
सिंधुदुर्ग 1
रत्नागिरी 6 1
औरंगाबाद 30 5 3
जालना 1
हिंगोली 1
परभणी 1
लातूर 8
उस्मानाबाद 3 1
बीड 1
अकोला 16 1
अमरावती 6 1
यवतमाळ 14 3
बुलडाणा 21 1 1
वाशिम 1
नागपूर 69 5 1
गोंदिया 1
चंद्रपूर 2 1
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 13 2
एकूण 4200 331 223

संबंधित बातम्या :

Corona Update : देशभरात 2546 रुग्णांची कोरोनावर मात, गेल्या 24 तासात 1553 नवे बाधित

Corona Update | मुंबईतील कोरोनाचा आकडा 3032 वर, राज्यात 4666 रुग्ण

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर होम क्वारंटाईन, घरुनच महापालिकेची कामे करणार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.