सोलापूर विद्यापीठांचं नामांतर, सुभाष देशमुखांचं भाषण रोखलं
सोलापूर: सोलापूर विद्यापीठाच्या नामांतर सोहळ्यात आज प्रचंड राडेबाजी पाहायला मिळाली. सोलापूर विद्यापीठाचं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असं नामकरण करण्यात आलं आहे. नामांतर सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या काही धनगर बांधवानी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचं भाषण रोखण्याचा प्रयत्न केला. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विद्यापीठ नामांतरासाठी कोणतेच प्रयत्न केले नाही, असा आरोप आंदोलकांनी केला. शिवाय या सोहळ्यात धनगर नेते […]
सोलापूर: सोलापूर विद्यापीठाच्या नामांतर सोहळ्यात आज प्रचंड राडेबाजी पाहायला मिळाली. सोलापूर विद्यापीठाचं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असं नामकरण करण्यात आलं आहे.
नामांतर सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या काही धनगर बांधवानी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचं भाषण रोखण्याचा प्रयत्न केला. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विद्यापीठ नामांतरासाठी कोणतेच प्रयत्न केले नाही, असा आरोप आंदोलकांनी केला. शिवाय या सोहळ्यात धनगर नेते गोपीचंद पडळकर यांना व्यासपीठावर का बोलावलं नाही, असा जाब विचारत या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा रोखण्याचा प्रयत्न झाला.
दरम्यान, जलसंपदा मंत्री राम शिंदे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, राज्यसभा खासदार विकास महात्मे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन कार्यक्रम सुरु असताना, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना व्यासपीठावर का बोलावलं नाही म्हणून त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. त्यामुळे थोड्यावेळासाठी दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम रोखावा लागला. मात्र महादेव जानकरांनी गोपीचंद यांना व्यासपीठावर बोलावल्यानंतर दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
त्यानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या भाषणावेळी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं भाषण रोखण्याचा प्रयत्न केला. सहकारमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. व्यासपीठावर सहकार मंत्री सुभाष देशमुख हे सगळ्यांच्या प्रयत्नाने नामांतर झाले असं सांगत आहेत, मात्र नामांतराच्या कोणत्याच प्रक्रियेमध्ये त्यांनी धनगर समाजाला मदत केली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.