राष्ट्रवादी प्रवेशासाठी नगरचे अनेक नेते इच्छुक, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंच्या दाव्याने खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी नगर जिल्ह्यातून अनेक जण इच्छुक आहेत, असा गौप्यस्फोट राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलाय.

राष्ट्रवादी प्रवेशासाठी नगरचे अनेक नेते इच्छुक, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंच्या दाव्याने खळबळ
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 6:40 PM

अहमदनगर : एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या रुपाने भाजपला मोठा धक्का बसला आहे. अशातच अहमदनगर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत, असा गौप्यस्फोट राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला. तनपुरेंच्या गौप्यस्फोटाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. (Some People are intrested to Join NCp Says Prajakt Tanpure)

राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास कोण-कोण उत्सुक आहेत त्यांचे नावे वेळ आल्यावर मी नक्की सांगेन, असंही तनपुरे म्हणाले आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यातून राष्ट्रवादीत कोण कोण प्रवेश करणार याचे आडाखे बांधायला सुरुवात झाली आहे. तसंच जे नाराज नेते आहेत त्यांची राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची इच्छा आहे, असा दावा मंत्री तनपुरे यांनी केला आहे.

“राष्ट्रवादीत सर्वांचा सन्मान ठेवला जातो. छोट्या कार्यकर्त्यापासून मोठ्या नेत्याचा आदर करायची आमची संस्कृती आहे. राष्ट्रवादी एकनाथ खडसे यांचा उचित सन्मान करेल, असंही तनपुरे म्हणाले. शरद पवारसाहेब एकनाथ खडसेंना योग्य तो न्याय देतील”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माजी मंत्री राम शिंदे यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत सन्मान ठेवला जाणार नाही, हे लवकरच दिसेल, असं म्हटलं होतं. राम शिंदे यांच्या टीकेला उत्तर देताना तनपुरे म्हणाले, “आमच्या पक्षात सर्वांचा योग्य तो सन्मान ठेवला जातो, हे राम शिंदे यांना लवकरच कळेल”.

“भारतीय जनता पक्षामध्ये एकनाथ खडसे यांना खूप त्रास झाला. त्यांच्यावर अन्याय केला गेला. शेवटी त्यांनी कंटाळून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राष्ट्रवादी प्रवेशाचा योग्य निर्णय घेतला. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने आमची ताकद नक्कीच वाढली आहे. तसंच पवारसाहेब त्यांना नक्की न्याय देतील”, असं तनपुरे म्हणाले.

एकनाथ खडसे आणि काका कुडाळकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश

गेल्या आठवड्यात दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या मनगटावर बांधलं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी लेक रोहिणी खडसे आणि असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला.

दुसरीकडे कोकणातील मातब्बर नेते आणि एकेकाळचे कट्टर राणे समर्थक काका कुडाळकर यांनीही राष्ट्रवादीचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी कुडाळमध्ये राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.

(Some People are intrested to Join NCp Says Prajakt Tanpure)

संबंधित बातम्या

खडसेंनंतर भाजपला मीरा-भाईंदरमध्येही मोठ्या झटक्याची शक्यता, बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार?

आज मन हलकं झालं, नाही तर मी गेलोच होतो; एकनाथ खडसे भावूक

खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच चंद्रकांतदादांची टीका; खडसे-पाटील जुंपली

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.