AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादच्या आमदार पुत्राची फेसबुकवर कमेंट करणाऱ्याला बदडून काढण्याची धमकी

आपण अनेकदा लोकप्रतिनिधी (आमदार/खासदार) हरवल्याची उपरोधिक पत्रके लावल्याच्या बातम्या पाहिल्या असतील. अशा पत्रकांमधून नागरिक नेहमीच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून मतदारसंघात लक्ष देण्याचे आवाहन करताना दिसतात.

औरंगाबादच्या आमदार पुत्राची फेसबुकवर कमेंट करणाऱ्याला बदडून काढण्याची धमकी
Follow us
| Updated on: Jul 07, 2019 | 5:14 PM

औरंगाबाद : आपण अनेकदा लोकप्रतिनिधी (आमदार/खासदार) हरवल्याची उपरोधिक पत्रके लावल्याच्या बातम्या पाहिल्या असतील. अशा पत्रकांमधून नागरिक नेहमीच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून मतदारसंघात लक्ष देण्याचे आवाहन करताना दिसतात. मात्र, औरंगाबादमध्ये आमदार मतदारसंघात दिसत नाही अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिल्याने आमदाराच्या मुलाने थेट बदडून काढण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

औरंगाबादमधील वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर मतदारसंघात दिसत नाही, असा आरोप एका नागरिकाने केला. याबाबत संबंधित व्यक्तीने फेसबुकवर आपले मत मांडले. याचा राग येऊन आमदार चिकटगावकर यांच्या मुलाने प्रतिक्रिया देणाऱ्या नागरिकाला थेट बदडून काढण्याचीच धमकी दिली.

ज्ञानेश्वर घोडके आणि सागर गुंड यांनी फेसबुकवर आमदार चिकटगावकर मतदारसंघात दिसत नसल्याचा आरोप करत विचारणा केली. यावर आमदार चिकटगावकर यांचे पुत्र अजय भाऊसाहेब चिकटगावकर यांनी या दोघांनाही मारहाण करण्याची धमकी दिली. अजय चिकटगावकर म्हणाले, “तुझा नंबर दे, सांगतो तुला आमदार कुठे असतात. फेसबुकवर खोटं बोलाल तर बदडून काढीन. समोर येऊन बोल मग सांगतो.”

या धमकीनंतर सध्या वैजापूरमध्ये याची बरिच चर्चा सुरु आहे. आमदार दिसत नाही, केवळ इतके विचारले म्हणून धमकी दिल्याने अजय चिकटगावकर यांच्यावर टीका होत आहे. तसेच ही गुंडगिरी असल्याचाही आरोप त्यांच्यावर होत आहे.