‘हा माझ्या वडिलांचा अपमान’, ‘मिस्टर इंडिया’च्या रिमेकवर सोनम कपूर भडकली

'मिस्टर इंडिया' चित्रपटाच्या रिमेकबाबत सुरु असलेल्या चर्चांवर अभिनेत्री सोनम कपूर भडकली आहे (Sonam Kapoor angry on MR. India Remake).

'हा माझ्या वडिलांचा अपमान', 'मिस्टर इंडिया'च्या रिमेकवर सोनम कपूर भडकली
Follow us
| Updated on: Feb 22, 2020 | 6:01 PM

मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक अली अब्बास जफरने ट्विटरवर ‘मिस्टर इंडिया’चा रिमेक बनवणार असल्याची घोषणा केली. मात्र, ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अनिल कपूरला याबाबत कोणतीही कल्पना न दिली गेल्यामुळे अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor angry on MR. India Remake) भडकली आहे. सोनमने आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर आपला राग व्यक्त केला.

“मिस्टर इंडियाचा रिमेक बनवला जात आहे. मात्र, याबाबत माझे वडील अनिल कपूर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. कारण या चित्रपटातील मुख्य भूमिका माझ्या वडिलांनी साकारली आहे. हे अपमानास्पद आहे. चित्रपटाच्या रिमेकबाबत माझे वडील अनिल कपूर आणि शेखर काका यांना विचारणंदेखील कुणाला उचित वाटलं नाही. त्या दोघांनी हा चित्रपट खूप मेहनतीने बनवला होता”, असं सोनम कपूर म्हणाली.

View this post on Instagram

#FYI

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor) on

दिग्दर्शक अली अब्बास जफरने आपल्या अधिकृत ट्विटरवर आपण ‘मिस्टर इंडिया’चा रिमेक करणार असल्याची माहिती दिली होती. “मिस्टर इंडिया बनविण्यासाठी उत्सूक आहे. प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळवणाऱ्या या भूमिकेला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी सध्या स्क्रिप्टवर काम करत आहे. या चित्रपटासाठी अजूनतरी एकाही अभिनेत्याला साईन केलेलं नाही. एकदा स्क्रिप्ट तयार झाली की कास्टिंग सुरु केली जाईल”, असं अली म्हणाला.

अलीच्या ट्विटनंतर ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेला अभिनेता अनिल कपूरची मुलगी अभिनेत्री सोनम कपूर भडकली आणि तिने इन्स्टाग्रामवर याबाबत आपली भूमिका व्यक्त केली (Sonam Kapoor angry on MR. India Remake).

दरम्यान, बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांनी ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाच्या रिमेकच्या चर्चांवर ट्विटमार्फत प्रतिक्रिया दिली आहे. “मिस्टर इंडियाच्या रिमेकची घोषणा केली गेली आहे आणि याबाबत मला माहितीदेखील नाही. याबाबत मला जेव्हा माहिती पडलं तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला”, असं शेखर म्हणाले. शेखर कपूर यांनी 1987 साली ‘मिस्टर इंडिया’ चित्रपट बनवला होता. या चित्रपटात अनिल कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक यश मिळवणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाचंदेखील नाव घेतलं जातं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.