बायो बबलचे नियम तोडून रस्त्यावर सिगरेट ओढणाऱ्या खेळाडूंवर 1 वर्षाची बंदी, श्रीलंकेच्या दिग्गज क्रिकेटपटूंची नाव सामिल

श्रीलंका क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. आधी टी-20 मालिका पराभूत झाल्यानंतर श्रीलंकचे काही दिग्गज क्रिकेटपटू बायो बबलचे नियम मोडून रस्त्यावर सिगारेट ओढताना आढळले आहेत. त्यांचा तसा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

बायो बबलचे नियम तोडून रस्त्यावर सिगरेट ओढणाऱ्या खेळाडूंवर 1 वर्षाची बंदी, श्रीलंकेच्या दिग्गज क्रिकेटपटूंची नाव सामिल
banned sri lankan cricketer
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 5:34 PM

डरहॅम : इंग्लंडच्या दौऱ्यावर असणाऱ्या श्रीलंका क्रिकेट संघातील काही दिग्गज क्रिकेटपटूंचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. इंग्लंडच्या दौऱ्यावर असणाऱ्य़ा श्रीलंकन क्रिकेटपटूंना कोरोनाच्या संकटामुळे कडक बायो बबलमध्ये राहण्याची सक्ती आहे. असे असतानाही काही श्रीलंकन क्रिकेटपटू बायो-बबलचे नियम मोडून कोणतीही कोरोना प्रतिबंधक काळजी न घेता सिगारेट ओढत रस्त्यावर फिरताना आढळून आले आहेत. संबधित खेळाडूंचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.  श्रीलंका क्रिकेट बोर्डाला (Sri Lanka Cricket Board) याबाबतची माहिती मिळताच त्यांनी कडक कारवाई करत व्हिडीओतील तिन्ही खेळाडूंवर 1 वर्षाची बंदी घातली आहे. (Sri lankan Cricketers Niroshan Dickwella Kusal Mendis and Danushka Gunathilaka Banned by Sri lanka Cricket Board For breaking Bio Bubble In England Tour)

या व्हिडीओत असणाऱ्या तिन्ही खेळाडूंची नाव कुसल मेंडिस (Kusal Mendis), निरोशन डिकवेला (Niroshan Dickwella) आणि दनुष्का गुणाथिलका (Danushka Gunathilaka) अशी आहेत. या तिघांनाही एक वर्षासाठी बॅन करण्यात आलं आहे.  कोरोना विषाणू संबधित नियम तोडल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

टी-20 मालिकेतही सुमार प्रदर्शन

संबधित तिन्ही खेळाडूंचे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील प्रदर्शनही खास नव्हते. कुसल मेंडिसने तीन सामन्यात केवळ 54 दावा केल्या. दनुष्काने तीन सामन्यात केवळ 26 धावांचे योगदान दिले. तर  निरोशन डिकवेलायाने दोन सामने खेळले ज्यात तो केवळ 14 धावाच करु शकला. ऑक्टोबर, 2020 नंतर सलग पाचव्या टी-20 मालिकेत श्रीलंका संघाला पराभावाचा सामना करावा लागला आहे.

मेंडिस आणि डिकवेला वरीष्ठ खेळाडू

कुसल मेंडिस आणि निरोशन डिकवेला हे दोघेही श्रीलंका क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू असून मागील बरीच वर्षे संघात आहेत. मेंडिसने 47 टेस्ट आणि 79 वनडे मॅचसह 29 टी-20 सामने खेळले आहेत. तर डिकवेलाने 2014 पासून श्रीलंका संघाकडून 45 टेस्ट, 53 वनडे आणि  28 टी-20 सामने खेळले आहेत. हे दोघेही 2015 च्या विश्वचषकाच्या संघात सामिल होते. तर गुणाथिलका याने 8 टेस्ट, 44 वनडे आणि 30 टी-20 सामने श्रीलंका संघाकडून खेळले आहेत.

हे ही वाचा –

ICC Test Rankings : न्यूझीलंड संघासह खेळाडूंची गरुडझेप, टॉप 10 मध्ये तीन भारतीय, ‘हा’ फलंदाज पहिल्या स्थानावर

ICC Cricket T20 World Cup 2021 Schedule : टी 20 वर्ल्ड कपच्या तारखा जाहीर, फायनल कधी?

World Social Media Day : ‘या’ क्रिकेटपटूंची सोशल मीडियावर सर्वात जास्त हवा, एका फोटोवर मिळवतात लाखो Likes

(Sri lankan Cricketers Niroshan Dickwella Kusal Mendis and Danushka Gunathilaka Banned by Sri lanka Cricket Board For breaking Bio Bubble In England Tour)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.