थोड्याच वेळात एसटी विलीनीकरणाचा फैसला, न्यायालय काय निर्णय देणार?

थोड्याच वेळात एसटी विलीनीकरणाचा फैसला, न्यायालय काय निर्णय देणार?

| Updated on: Feb 22, 2022 | 3:25 PM

गेल्या 109 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप (St Worker Strike) सुरु आहे. आज एसटीच्या विलीनीकरणावर कोर्टात (Hight Court) फैसला होणार आहे. गेल्या अनेक दिवासांपासून राज्य सरकारकडून अनेक आवाहनं करूनही हे आंदोलन संपलं नव्हतं. शेवटी शेवटी तर खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यात उतरले मात्र तरीही काही कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणावर ठाम राहत संप सुरूच ठेवला. एसटीच्या विलीनीकरणाचा निर्णय […]

गेल्या 109 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप (St Worker Strike) सुरु आहे. आज एसटीच्या विलीनीकरणावर कोर्टात (Hight Court) फैसला होणार आहे. गेल्या अनेक दिवासांपासून राज्य सरकारकडून अनेक आवाहनं करूनही हे आंदोलन संपलं नव्हतं. शेवटी शेवटी तर खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यात उतरले मात्र तरीही काही कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणावर ठाम राहत संप सुरूच ठेवला. एसटीच्या विलीनीकरणाचा निर्णय येण्याच्या काही वेळ आधीच महामंडळाकडून एका महत्वाच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. एसटी संपामुळे महामंडळाचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान होत असले तरी हे नुकसान कर्तव्यावर रूजू झालेल्या कामगारांकडून वसूल करण्याचा महामंडळाने कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी स्पष्टोक्ती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी आज दिली. त्यामुळे निर्णय येण्याआधीच एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Published on: Feb 22, 2022 03:19 PM