AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात पशु खाद्याच्या आड दारुची तस्करी, 51 लाखांचा माल जप्त

नागपुरात चक्क पशु खाद्याच्या आड दारुची तस्करी केली जात असल्याची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली (liquor Smuggling In Nagpur) आहे.

नागपुरात पशु खाद्याच्या आड दारुची तस्करी, 51 लाखांचा माल जप्त
Follow us
| Updated on: Jul 01, 2020 | 5:28 PM

नागपूर : दारु तस्करीसाठी वेगवेगळे फंडे तस्कर वापरताना दिसतात. नागपुरात चक्क पशु खाद्याच्या अडून दारुची तस्करी केली जात असल्याचं उघड झाले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत ही बाब पुढे आली आहे. (State Excise Department Action Against liquor Smuggling In Nagpur)

नागपुरात एका ट्रकमधून पशु खाद्य उतरवलं जातं होतं. मात्र याच्या आड दारुची तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. पशुखाद्य वाहतुकीचा परवाना या ट्रक चालकाकडे आहे. मात्र ज्या वाहनाचा परवाना आहे. त्यात अर्ध पशु खाद्य आणि मध्यभागी दारुचे 600 बॉक्स ठेवण्यात आले आहे.

हे बॉक्स दारुबंदी असलेल्या चंद्रपुरात घेऊन जाण्यात येणार होते. ही सर्व दारु मध्यप्रदेशातून आणण्यात आली आहे. या मालाची किंमत 51 लाखाच्या जवळपास आहे.

दारू तस्कर वेगवेगळ्या पद्धती वापरून तस्करी करतात आणि शासनाचा कर बुडवितात, असे अनेकदा समोर आले आहे. दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात या माध्यमातून मोठी कमाई केली जाते. त्यामुळे यावर कायम स्वरूपी प्रतिबंध आणण्याची खरी गरज आहे. (State Excise Department Action Against liquor Smuggling In Nagpur)

संबंधित बातम्या : 

Baramati Crime | बारामतीत चालकासह ट्रक पळवला, साडेचार कोटींच्या सिगारेटची चोरी, 7 जणांना अटक

यवतमाळमध्ये हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 47 लाखांचा मुद्देमाल जप्त, 38 जणांना अटक