AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Unlock 1 | खिडक्या उघडा, तीन फुटांवर बसा, राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी गाईडलाईन्स

राज्यातील सार्वजनिक कार्यालये हळूहळू सुरु होण्याची चिन्हं असल्याने राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत (State Government Guidelines Employees)

Unlock 1 | खिडक्या उघडा, तीन फुटांवर बसा, राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी गाईडलाईन्स
नोकरी बदलल्यास आता पीएफप्रमाणे ग्रॅज्युएटीही होणार ट्रान्सफर
Follow us
| Updated on: May 31, 2020 | 4:04 PM

मुंबई : चौथ्या लॉकडाऊनच्या शेवटानंतर ‘अनलॉक’च्या पहिल्या टप्प्यात प्रवेश करताना प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात शिथिलता देण्यात येत आहे. राज्यातील सरकारी आणि खासगी ऑफिसही हळूहळू सुरु होण्याची चिन्हं असल्याने राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. कंपनीने दोन कर्मचाऱ्यांची प्रत्येकी तीन फूट अंतर राखून बसण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. (State Government Guidelines for Office Employees)

कार्यालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे आणि अभ्यागतांचे तापमान थर्मल स्क्रिनिंग किंवा इन्फ्रारेडच्या माध्यमातून करणे बंधनकारक आहे. हवा खेळती राहण्यासाठी कार्यालयांच्या खिडक्या दिवसभर उघड्या ठेवाव्यात. सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत तीनपदरी किंवा सर्जिकल मास्कची सक्ती करण्यात आली आहे. एकाच वाहनातून अनेक अधिकारी-कर्मचारी यांनी एकत्र प्रवास करु नये, अशा सूचना आहेत.

कार्यालयीन बैठकांसाठी अधिकारी किंवा कर्मचारी यांना प्रत्यक्ष बोलवू नये, त्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्स करावे. कर्मचाऱ्यांनी एकत्र बसणे, डबा खाणे किंवा एकत्र जमणे टाळावे, असाही सल्ला देण्यात आला आहे. एकच काम अनेकांनी करणे आवश्यक असल्यास दोन-तीन व्यक्तींचे लहान गट करावेत, यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याला जंतूसंसर्ग झाला, तरी फक्त त्यांच्या गटाचे अलगीकरण करता येईल, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

कर्मचाऱ्यांना कोव्हीड संसर्ग झाल्यास…

एखाद्या कर्मचाऱ्याला 100.4 डिग्रीपेक्षा जास्त ताप, खोकला किंवा दम लागत असल्यास तात्काळ रुग्णालयात दाखल करावे. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांना पुढील 14 दिवस कार्यालयात येऊ देऊ नये. अलगीकरण करण्याबाबत आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्यात. contact tressing करुन हाय रिस्क आणि लो रिस्क अशा दोन याद्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

(State Government Guidelines for Office Employees)

संबंधित बातम्या 

Lockdown 5.0 | हॉटेल, धार्मिक स्थळ, शॉपिंग मॉल्स कधी उघडणार? कुठे काय सुरु, काय बंद?

Lockdown 5.0 : प्रवासासाठी परवानगीची गरज नाही, लॉकडाऊन 5 चे नियम आणि टप्पे कोणते?

LOCKDOWN 5.0 | देशातील लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला, केंद्र सरकारकडून नियमावली जारी

(State Government Guidelines for Office Employees)

पंतप्रधान मोदी थेट आदमपूर एअर बेसवर पोहोचले, त्यानंतर..
पंतप्रधान मोदी थेट आदमपूर एअर बेसवर पोहोचले, त्यानंतर...
भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक
भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक.
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला.
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं.
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार.
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी.
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप.
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?.
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान.
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.