उस्मानाबादेत एसटी बसवर दगडफेक, पोलीस बंदोबस्तातही बसच्या काचा फोडल्या
उस्मानाबाद ते पुणे बस कौडगाव येथे फोडली तर दुसरी एक एसटी बस उस्मानाबाद ते उमरगा बस चौरस्ता येथे फोडली. पोलीस बंदोबस्तात ही प्रवासी वाहतूक सुरु करण्यात आली होती. मात्र तरीही अज्ञातांनी बसवर दगडफेक केली.
उस्मानाबादः एसटी महामंडळाचं (ST Strike) राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीवरून एसटी कर्चमाऱ्यांचं गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरु आहे. उस्मानाबाद (Osmanabad Depot ) डेपोमध्येही एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. मात्र राज्यसरकारने कायदेशीर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर काही कर्मचारी कामावर रुजू होत आहेत. या कर्मचाऱ्यांनी आगाराबाहेर काढलेल्या बसवरच दगडफेक करण्यात आली.
2 बसवर अज्ञातांची दगडफेक
उस्मानाबाद येथे आजपासून 8 बसने प्रवासी वाहतूक सुरु करण्यात आली होती. मात्र यापैकी 2 एसटी बस अज्ञात लोकांनी दगडफेक करीत फोडल्या. उस्मानाबाद ते पुणे बस कौडगाव येथे फोडली तर दुसरी एक एसटी बस उस्मानाबाद ते उमरगा बस चौरस्ता येथे फोडली. पोलीस बंदोबस्तात ही प्रवासी वाहतूक सुरु करण्यात आली होती. मात्र तरीही अज्ञातांनी बसवर दगडफेक केली.
कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन नाही
दरम्यान, महिनाभर कामावर रुजू न झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना या महिन्याचे वेतन मिळणार नाही, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. पगारवाढ केल्यानंतरही काही कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. वेतनवाढीच्या निर्णयानंतर तब्बल 19 हजार कर्मचारी कामावर परतले आहेत. दरम्यान, जे कर्मचारी कामावर हजर आहेत, त्यांनाच मंगळवारी वेतन देण्यात येईल, असे सूचक वक्तव्य परब यांनी केले आहे.
इतर बातम्या-