ऑनलाईन परीक्षांमध्ये घोळात घोळ; पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रावर अभाविपचे जोरदार आंदोलन

ऑनलाईनच्या परीक्षेत होत असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) आज जोरदार आंदोलन केलं. (student facing online examination technical problem, abvp agitation in nashik)

ऑनलाईन परीक्षांमध्ये घोळात घोळ; पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रावर अभाविपचे जोरदार आंदोलन
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 1:26 PM

नाशिक: ऑनलाईनच्या परीक्षेत होत असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) आज जोरदार आंदोलन केलं. यावेळी विद्यार्थी आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडतानाच ऑनलाईन परीक्षांमधील तांत्रिक अडचणी दूर करण्याची जोरदार मागणी केली. (student facing online examination technical problem, abvp agitation in nashik)

पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राने नुकत्याच ऑनलाईन परीक्षा घेतल्या होत्या. यावेळी लॉग इनपासून ईमेल आयडीपर्यंतच्या अनेक अडणींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागले. पेपर ओपन होण्यापासून ते नेटवर्कच्या समस्येपर्यंतच्या अडचणी या विद्यार्थ्यांना झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन निकालातही अनेक अडचणी होत्या. विद्यार्थ्यांनी या अडचणी विद्यापीठ प्रशासनाकडे मांडूनही त्यात काहीच सुधारणा झाली नाही.

विद्यार्थ्यांचा पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा

त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभाविपकडे या समस्या मांडल्या. अभाविपने विद्यार्थ्यांना येणाऱ्या या अडचणी विद्यापीठ प्रशासनाच्या नजरेस आणून दिल्या. त्यानंतरही हा प्रश्न न सुटल्याने अखेर विद्यार्थी संघटनेचा संयम सुटला. त्यामुळे अभाविपने आज विद्यापाठीच्या या उपकेंद्रासमोर जोरदार आंदोलन करून विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा निषेध नोंदवला. यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. सकाळी 11 वाजता विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरू करून संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या आंदोलनानंतर अभाविपच्या प्रतिनिधींनी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर केले. तसेच ऑनलाईनचा घोळ संपुष्टात न आल्यास पुन्हा उग्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

परीक्षा देऊनही नापास, विद्यार्थ्यांचा संताप

विद्यापीठाने घेतलेल्या ऑनलाईन परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना अडचणी येऊनही विद्यापीठाने याकडे साफ दुर्लक्ष केलंय. काही विद्यार्थ्यांच्या रिझल्टमध्ये प्रॉब्लेम झालेले आहेत, अनेकांनी तर परीक्षा देऊनही त्यांना रिझल्टमध्ये फेल दाखवलं गेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश घेता येत नाहीये. वेळोवेळी विद्यापीठाकडे विचारणा करूनही उत्तर मिळत नसल्यामुळे आज आंदोलन करण्याची वेळ आल्याचं तन्मय बोरसे या विद्यार्थ्याने सांगितलं. विद्यार्थ्यांच नुकसान झाल तर याला जबाबदार विद्यापीठच राहील असा आरोप ही तन्मय बोरसे याने केला. (student facing online examination technical problem, abvp agitation in nashik)

संबंधित बातम्या:

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 8 डिसेंबरपासून बॅकलॉगची परीक्षा; सुमारे सव्वा दोन लाख विद्यार्थी परीक्षा देणार

उदय सामंतांची प्राध्यापकांसाठी मोठी घोषणा, तब्बल 7 वर्षानंतर संप काळातील वेतन मिळणार

‘इग्नू’तील ऑनलाईन प्रवेशाची तारीख वाढवली; 15 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार

(student facing online examination technical problem, abvp agitation in nashik)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.