AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून आघाडीने लोकसभेला माझं तिकीट कापलं, खा. सुजय विखेंचा गौप्यस्फोट

हेलिकॉप्टर या एकमेव कारणामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने माझं लोकसभेला तिकीट कापलं, असा गौप्यस्फोट खासदार सुजय विखे यांनी केला आहे.

...म्हणून आघाडीने लोकसभेला माझं तिकीट कापलं, खा. सुजय विखेंचा गौप्यस्फोट
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 12:15 AM

अहमदनगर :  हेलिकॉप्टर या एकमेव कारणामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने माझं लोकसभेला तिकीट कापलं, असा गौप्यस्फोट खासदार सुजय विखे यांनी केला आहे. अहमदनगरच्या वाळकीमधल्या सभेत बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला. (Sujay Vikhe patil On Loksabha Candidancy And Sharad pawar)

सुजय विखे म्हणाले, “उमेदवारी देण्याच्या अगोदर ज्येष्ठ नेते पवार साहेबांनी मला प्रश्न विचारला की तू आताच जर हेलिकॉप्टरमधून फिरत असशील तर तू  निवडून कसा येणार?. नंतर आघाडीने मला तिकीट नाकारलं. आणि त्यानंतरचं सगळं आपल्यासमोर आहे”, असं सुजय विखे म्हणाले.

“हेलिकॉप्टरचा कुणाला फायदा कुणाला झाला असेल-नसेल, पण माझं हेलिकॉप्टरने नक्की नुकसान झालंय, असं ते म्हणाले. मात्र त्याकाळात जरी नुकसान वाटलं असेल तरी आता आज त्याचे फायदे मला दिसतात, असं सांगायला देखील ते विसरले नाहीत.

आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत असल्याचा मला मनोमन अभिमान वाटतो. मोदी ज्या झंझावाताने काम करतात त्या कामाचं मला अप्रूप असल्याचं देखील सुजय विखे म्हणाले.

विखे-शरद पवार वाद

आघाडीत बिघाडी झाली तरी चालेल, पण नगर दक्षिणची जागा काँग्रेससाठी सोडणार नाही, असा पवित्रा लोकसभेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्याचं चित्र होतं. तत्कालिन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आताचे भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखेंना ही जागा हवी होती.

आघाडीत ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येत होती. पण नगरमध्ये राष्ट्रवादीचं प्राबल्य असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी ही जागा सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर सुजय विखेंनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. भाजपने सुजय यांना लोकसभेची उमेदवारी घोषित केली. राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांना हरवून ते लोकसभेत पोहचले तसंच तिकीट नाकारणाऱ्या आघाडीला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

(Sujay Vikhe patil On Loksabha Candidancy And Sharad pawar)

संबंधित बातम्या

बाळासाहेब विखे विरुद्ध शरद पवार यांच्यातला वाद नेमका काय आहे?

ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.
बलुचिस्तानकडून पाक आणि चीनला उघड धमकी, VIDEO शेअर करत वाढवलं टेन्शन
बलुचिस्तानकडून पाक आणि चीनला उघड धमकी, VIDEO शेअर करत वाढवलं टेन्शन.
पाकड्यांना पाडलं उघडं, भारतीय लष्करानं सांगितलं काय खरं काय खोटं
पाकड्यांना पाडलं उघडं, भारतीय लष्करानं सांगितलं काय खरं काय खोटं.
अमृतसरमध्ये पाकचं ड्रोन घरावर, काचा फुटल्या तर कुठ आग लागली, बघा VIDEO
अमृतसरमध्ये पाकचं ड्रोन घरावर, काचा फुटल्या तर कुठ आग लागली, बघा VIDEO.
पाकच पितळ उघडं, गेले हल्ला करायला अन् मिसाईल फुटलंच नाही; फुसका बार...
पाकच पितळ उघडं, गेले हल्ला करायला अन् मिसाईल फुटलंच नाही; फुसका बार....
राजस्थानात स्फोट, मध्यरात्री भारताच्या धमाक्यांनी पाक एअरबेस उद्ध्वस्त
राजस्थानात स्फोट, मध्यरात्री भारताच्या धमाक्यांनी पाक एअरबेस उद्ध्वस्त.
पाक सेनेसाठी तबाहीची सकाळ, भारताने 'हे' 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवल
पाक सेनेसाठी तबाहीची सकाळ, भारताने 'हे' 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवल.
पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून...
पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून....