Rajnikanth | सुपरस्टार रजनीकांत तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत

अभिनेते आणि तामिळ चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत पुढील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची चिन्हं आहेत. रजनीकांत आपल्या ‘रजनी मक्कल मन्दरम’ पक्षाकडून निवडणूक लढवण्याचे संकेत आहेत.

Rajnikanth | सुपरस्टार रजनीकांत तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत
Follow us
| Updated on: Nov 29, 2020 | 6:50 PM

मुंबई :  अभिनेते आणि तामिळ चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत पुढील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची चिन्हं आहेत. रजनीकांत आपल्या ‘रजनी मक्कल मन्दरम’ पक्षाकडून निवडणूक लढवण्याचे संकेत आहेत. रजनीकांत 30 नोव्हेंबरला याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.(Superstar Rajinikanth prepares to contest Tamil Nadu Assembly elections) रजनीकांत यांनी डिसेंबर 2017 मध्ये ‘रजनी मक्कल मन्दरम’ या पक्षाची स्थापन केली होती. मात्र गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाचे उमेदवार उतरवले नव्हते. परंतु 2021 मध्ये होऊ घातलेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकांमधून पक्ष पहिल्यांदाच रिंगणात उतरण्याची चिन्हं आहेत दुसरीकडे सोशल मीडिया वापरकर्तेही रजनीकांतच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. लोक ट्विटरवर हे सतत ट्वीट करत आहेत.

रजनीकांत यांना आरोग्याविषयी नेमकी कोणती काळजी? रजनीकांत यांची किडनीची स्थिती खराब असल्याने डॉक्‍टरांनी रजनीकांत यांना दगदग, धावपळ आणि दीर्घ प्रवास न करण्याचा सल्ला होता. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर प्रवास करणं धोकादायक असल्याचं सांगितलं होत.कोरोनाची लस हाच कोरोनावरील एकमेव उपाय आहे. ती येऊपर्यंत कोरोनाचा धोका कायम असेल. रजनीकांत यांचं शरीर कोरोना सहन करु शकेल की नाही याविषयी डॉक्टरांनी काळजी व्यक्त केली होती. दरम्यान, मागील 2 वर्षांपासून रजनीकांत अनेक राजकीय आणि सामाजिक विषयांवर पुढाकार घेऊन बोलले आहेत. मात्र, चित्रपटसृष्टीतील त्यांचे सहकारी कमल हसन यांच्या तुलनेत त्यांचा औपचारिक राजकीय प्रवेशाला मात्र बराच उशीर झाला आहे. दुसरीकडे अभिनेता कमल हसन यांच्या ‘मक्कल नीधी मैयम’ पक्षाने मागील लोकसभा निवडणुकीतही आपले उमेदवार उतरवले होते. कोरोना काळातील लॉकडाऊननंतर जवळपास सर्व चित्रपटांचे चित्रीकरण ठप्प झाले होते. आता देशात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असून, सर्व चित्रपटांचे चित्रीकरण पुन्हा एकदा सुरू केले जात आहे. मात्र, थलायवा’ रजनीकांत  यांच्या आगामी ‘अन्नाथे’  चित्रपटाच्या चित्रीकरणाबाबत निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. रजनीकांत यांच्या तब्येतीची काळजी घेऊन चित्रपट पूर्ण केला जाणार आहे. पुढच्या वर्षीपर्यंत चित्रपट पुन्हा सुरू करण्याची निर्मात्यांची योजना नसल्याचे कळते आहे.

लवकरच चित्रीकरण सुरू होईल…

हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले शूटिंग वेळापत्रक पूर्ण केले होते. लॉकडाऊन आधी कलाकार आणि क्रू मेंबर चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी परदेश दौर्‍यावर जातील, अशी घोषणा करण्यात आली होती. निर्मात्यांनी या चित्रपटाचे चित्रीकरण अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त माध्यमांमध्ये पसरले होते.मात्र, निर्मात्यांनी हे वृत्त फेटाळून लावत अफवा असल्यचे सांगितले. ‘या चित्रपटाविषयी अफवा पसरवल्या गेल्या आहेत.

संबंधित बातम्या : 

Rajnikanth | कोरोनाचा धसका, तब्बेतीची काळजी, ‘थलायवा’ रजनीकांतचे चित्रपट लांबणीवर!

Rajinikanth | रजनीकांत यांचे राजकारणातील प्रवेशावर पुनर्विचाराचे संकेत, ‘लीक लेटर’वर म्हणाले…

(Superstar Rajinikanth prepares to contest Tamil Nadu Assembly elections)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.