Uniform Civil Code: समान नागरी कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

घटनेच्या कलम १६२ नुसार दोन्ही राज्यांनी गठीत केलेल्या समितीचा निर्णय योग्य आहे. एखादी समिती गठीत करण्याच्याविरोधात याचिका दाखल करता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटलंय. न्यायालयाच्या या टिप्पन्नीनंतर याचिकाकर्त्याने आपली याचिका मागे घेतली.

Uniform Civil Code: समान नागरी कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय
ऐतिहासिक निर्णय! 10 टक्के आर्थिक आरक्षण वैधच; ईडब्ल्यूएसववर सर्वोच्च न्यायालयानं नेमकं काय म्हटलं?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 09, 2023 | 2:39 PM

नवी दिल्ली: समान नागरी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय. गुजरात आणि उत्तराखंड सरकारने यासंदर्भात नेमलेल्या समितीच्या विरोधात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलाय. CJI जस्टिस डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पीठाने यासंदर्भात निर्णय दिला आहे. यासंदर्भात दाखल याचिका फेटाळून लावत गुजरात व उत्तराखंड सरकारचा निर्णय योग्य ठरवलाय.

गुजरातमध्ये भाजप सरकारने समान नागरी कायदा (Uniform Civil Code) लागू करण्यासाठी पावले टाकली होती. सरकारने समान नागरी कायद्यासाठी एक समिती गठित केली. उत्तराखंड सरकारने अशीच समिती गठीत केली. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. या याचिकेवर सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड आणि न्यायमुर्ती पी.एस.नरसिन्हा यांनी निर्णय दिला. घटनेच्या कलम १६२ नुसार दोन्ही राज्यांनी गठीत केलेल्या समितीचा निर्णय योग्य आहे. एखादी समिती गठीत करण्याच्याविरोधात याचिका दाखल करता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटलंय. न्यायालयाच्या या टिप्पन्नीनंतर याचिकाकर्त्याने आपली याचिका मागे घेतली.

हे सुद्धा वाचा

भाजपचे समर्थन :

‘एक देश, एक नियम’ असा भाजपचा नारा आहे. त्यासाठी घटनेतील अनुच्छेद 44 मधील भाग 4 चा दाखला भाजप देते. यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोडचा उल्लेख आहे. त्याचा आधार घेत भाजप देशात समान नागरी कायद्यासाठी आग्रही भूमिका मांडत आहे.

काय आहे समान नागरी कायदा : धर्माच्या आधारे देशात वेगवेगळी व्यवस्था नसावी. प्रत्येक धर्मासाठी एकच कायदा असावा. विवाह, घटस्फोट आणि संपत्तीच्या मुद्यावर सर्व नागरिकांसाठी एकच कायदा आणि व्यवस्था असावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.