महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी चुकीची, सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला फटकारले

ठाकरे सरकार हटवून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी यासाठी विक्रम गेहलोत यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी चुकीची, सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला फटकारले
Follow us
| Updated on: Oct 16, 2020 | 2:10 PM

मुंबई : राज्यात ठाकरे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, महाराष्ट्रामध्ये राष्ट्पती शासन लावण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. उद्धव ठाकरे सरकारला हटवून राष्ट्रपती शासन लागू करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिला असून आपण राष्ट्रपतींकडे जाऊ शकता अशा शब्दात याचिकाकर्त्याला उत्तर देण्यात आलं आहे. ही याचिका सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली आहे. (Supreme Court rejected demand for imposition of presidential rule)

ठाकरे सरकार हटवून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी यासाठी विक्रम गेहलोत यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर तुम्हाला महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे, हे माहित आहे का, असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्ते गेहलोत यांना खडेबोल सुनावले. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सरकार संविधानाच्या आधारावर काम करत नाही असा आरोप याचिकर्ते गेहलोत यांनी केला होता. पण मुंबईत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची घटना घडली. त्यावरून संपूर्ण राज्यात राष्ट्रपती शासन लागू करणे योग्य नसल्याचे सरन्यायाधीश म्हणाले.

दरम्यान, राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका वाढत असताना दुसरीकडे, मराठा आरक्षण, अस्मानी संकट डोक्यावर आहे अशात राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. त्यामुळे विरोधकांनी जोर धरत ठाकरे सरकार हटवण्याची मागणी केली होती. इतकंच नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, अशी शक्यता प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या कायद्याकडे कानाडोळा करत आहे. कृषी विधेयक स्वीकारणार नाही, असं राज्य सरकारने म्हटलं आहे. पण केंद्र सरकारने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रमध्ये संविधानानुसार राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकतो, असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला होता.

इतर बातम्या –

अशा भेटी होत राहतात, त्यात काही काळबेरं नाही, शिवेंद्रसिंहराजे भेटीवर अजित पवारांचा खुलासा
Gold Rate: सोन्याच्या किंमतीने मोडला रेकॉर्ड, 5547 रुपयांनी झालं स्वस्त; वाचा आजचे दर

(Supreme Court rejected demand for imposition of presidential rule)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.