Kapil Sharma | ‘द कपिल शर्मा शो’च्या आगामी भागात सुरेश रैनाची जोरदार फटकेबाजी!

‘द कपिल शर्मा शो’च्या आगामी भागात भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि त्याची पत्नी प्रियंका हजेरी लावणार आहेत. या शोमध्ये सुरेश रैना जोरदार फलंदाजी, विनोदी गोलंदाजी आणि हशाचे षटकार मारणार आहे.

Kapil Sharma | ‘द कपिल शर्मा शो’च्या आगामी भागात सुरेश रैनाची जोरदार फटकेबाजी!
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 2:12 PM

मुंबई :द कपिल शर्मा शो’च्या आगामी भागात भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि त्याची पत्नी प्रियंका हजेरी लावणार आहेत. या शोमध्ये सुरेश रैना जोरदार फलंदाजी, विनोदी गोलंदाजी आणि हशाचे षटकार मारणार आहे. कपिल शर्मा सोबतचे काही मस्ती करतानाचे फोटो सुरेश रैनाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सुरेश रैनाने कपिल शर्मा आणि टिमचे आभार मानले आहेत. यापूर्वीही सुरेख रैना कपिलच्या शोमध्ये 2017ला शिखर धवन आणि हार्दिक पंड्या सोबत आला होता. (Suresh Raina Coming to The Kapil Sharma Show) द कपिल शर्मा शोमध्ये सुरेश रैना आपल्या क्रिकेटचे काही किस्से, प्रेक्षकांसोबत शेअर करणार आहे. सुरेश रैनाने कपिलच्या शोचे काही फोटो शेअर केले आणि लिहिले की, ‘काय जबरदस्त शो आहे. कपिल शर्मा तु नेहमीच उत्तम होस्ट ठरतोस.’ संपूर्ण टीम आणि क्रू मेंबर यांनी मिळून हे शूट आणखी मजेदार बनवले आहे. सुरेश रैना आणि त्याच्या पत्नीने द कपिल शर्मा शोमध्ये येताना कपिल शर्माची मुलगी अनायरा हिच्यासाठी भेटवस्तूही आणल्या आणि एवढेच नाहीतर द कपिल शर्मा शोच्या संपूर्ण टिमसाठी भेटवस्तू आणल्या.

What a fantastic show it’s been, @KapilSharmaK9 as always you have been such an amazing host. The whole team & crew made it such a fun shoot. Thank you everyone for having us & giving a big shoutout to @maateCare pic.twitter.com/uPsL96p8ik

द कपिल शर्मा शोच्या या आठवड्यात अक्षय कुमार आपला आगामी चित्रपट लक्ष्मी बॉम्बच्या प्रमोशनसाठी कियारा अडवाणी सोबत दिसणार आहे. अक्षय कॉमेडी शोमध्ये बरीच मस्ती करताना दिसणार आहे. शोच्या प्रमो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका वेब सीरिजमध्ये दिसणार कपिल शर्मा द कपिल शर्मा शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेता कपिल शर्मा आता लवकरच एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजसाठी त्याने एक-दोन नव्हे तर 20 कोटी रुपये घेतल्याचा दावा अभिनेता कृष्णा अभिषेकने केला आहे. ‘द कपिल शर्मा’ शोच्या एका भागात कृष्णाने हा गौप्यस्फोट केला होता. मात्र, नंतर ही केवळ गंमत असल्याचं नंतर सांगण्यात होते. कॉमेडियन कपिल शर्मा टीव्ही इंडस्ट्रीचे एक प्रसिद्ध नाव आहे. त्याने केवळ टेलिव्हिजनवर आपली क्षमता सिद्ध केली नाही, तर बॉलिवूड सेलिब्रिटींमध्येही तो खूप लोकप्रिय आहे. कपिल लवकरच वेब सीरिजच्या माध्यमातून डिजिटलमध्ये पदार्पण करणार आहे, याची चर्चा सर्वत्र आहे. कपिल त्याच्या डिजिटल पदार्पणासाठी 20 कोटी रुपये घेत असल्याचे अलिकडेच कृष्णा अभिषेकने सांगितलं. मात्र तो एक विनोद असल्याचे नंतर सांगण्यात आले. परंतु कपिल शर्मा डिजिटलमध्ये पदार्पणासाठी एवढी मोठी रक्कम घेणार आहे. हे ऐकल्यावर अनेकांना धक्काच बसला. कपिल शर्माच्या अनेक चाहत्यांनी याबद्दल कपिलला विचारण्याचा प्रयत्नही केला, मात्र कपिलकडून कोणतेही उत्तर मिळू शकले नाही. कपिल शर्मा त्याच्या डिजिटल पदार्पणासाठी खरोखरच २० कोटी घेणार आहे का? याचे कुतूहल मात्र त्याच्या चाहत्यांना अजूनही आहे.

संबंधित बातम्या : 

‘द कपिल शर्मा’ शोच्या आगामी भागात रितेश आणि जेनेलिया; धम्माल मस्ती पाह्यला मिळणार

शिवसेना नगरसेवकाकडून कपिल शर्माचे आभार, चार वर्ष जुन्या वादावर पडदा

(Suresh Raina Coming to The Kapil Sharma Show)

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....